महिलांसाठी उद्योग कार्यशाळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:50 AM2021-01-08T05:50:49+5:302021-01-08T05:50:49+5:30
या कार्यशाळेमध्ये बचत गटाच्या महिला तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण उपस्थित होते. सर्वप्रथम शिंदी गावचे ग्रामसेवक अर्जुन गवई तसेच सरपंच ...
या कार्यशाळेमध्ये बचत गटाच्या महिला तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण उपस्थित होते. सर्वप्रथम शिंदी गावचे ग्रामसेवक अर्जुन गवई तसेच सरपंच विनोद खरात, नितीन डाखोरे, शाळा समितीचे अध्यक्ष विलास तोडे, महिला बचत गटाच्या अध्यक्ष स्वाती विनोद मार्के यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले. अर्जुन गवई यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व महिलांच्या बचत गटाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहील, अशी ग्वाही दिली . उद्योग कार्यशाळेचे मार्गदर्शक अविनाश खिल्लारे व तसेच उमेश खारडे यांनी उद्योगाबाबत मार्गदर्शन केले, तसेच कोणते उद्योग महिलांच्या फायद्यासाठी आहेत, कोणते उद्योग तोट्यासाठी आहेत, याची सविस्तर मांडणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर अकोला येथील तरुण उद्योजक मयूर घुसरकर, मेहकरचे सचिन जोशी यांच्या हस्ते उपस्थित कार्यशाळेतील महिलांना व तरुणांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . संचालन सचिन खंडारे यांनी केले तर आभार पवन गवई यांनी मानले .