काेराेनातून सावरलेल्या बालकांना एमएसआय-सी आजाराचा धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:03 AM2021-06-23T11:03:40+5:302021-06-23T11:04:01+5:30
Childrens suffering from MSI-C disease : काेराेनातून सावरलेल्या बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमएसआय-सी) हा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे.
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेनाची तिसरी लाट येणार असल्याची तसेच यामध्ये लहान बालके संसर्गीत हाेण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच काेराेनातून सावरलेल्या बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमएसआय-सी) हा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे. या आजाराने ग्रस्त एका बालकावर उपचार सुरू आहेत. आजाराचा धाेका पाहता आराेग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे़
काेराेनाची दुसरी लाट शहरांसह ग्रामीण भागात पाेहचली हाेती. काेराेनामुळे अनेक जण गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले हाेते. काेराेनाने अनेकांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात ४३० पेक्षा अधिक बालकांना काेराेना संसर्ग झाला हाेता. काेराेनातून सावरलेल्या बालकांना एमएसआय-सी हा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे. या आजारामुळे मुलांना अंगात ताप भरतो. तसेच हा आजार हृदय, मेंदू आणि फुप्फुस अशा महत्त्वाच्या भागांवर हल्ला करतो. तसेच लहान मुलांमध्ये तीन ते पाच दिवस ताप, तीव्र पोटदुखी तसेच रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे सुद्धा आजारात जाणवतात. त्यामुळे, काेराेनातून बरे झालेल्या मुलांकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच तिसऱ्या लाटेत मुलांना काेराेना संसर्ग हाेऊच नये यासाठी उपाय याेजना करण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्ह्यात यासंदर्भाने सर्वेक्षण सुरू आहे. सध्या एक मुलामध्ये अनुषंगीक लक्षणे आढळल्यामुळे सर्वेक्षण सुरू झाले.
अशी आहेत लक्षणे
- मुलांना खूप ताप येणे,पाच दिवसांपर्यंत कमी न हाेणे
- मुलांच्या पाेटात दुखणे
- मळमळ हाेणे, उलट्या हाेणे
- स्कीनवर रॅसेस पडणे
- डाेळे लाल हाेणे
ही घ्यावी काळजी
काेराेना हाेउच नये यासाठी मुलांना मास्क शिवाय बाहेर पडू देउ नये, सतत ताप असल्यास किंवा तीव्र पाेट दुखी असल्यास डाॅक्टरांना दाखवावे
मुलांमध्ये लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, मुलांना पाेस्टीक भाेजन द्यावे.
काेराेनातून बरे झालेल्या मुलांकडे लक्ष द्यावे.
काेराेनातून बरे झालेल्या शुन्य ते १९ वर्षांच्या मुलांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार हाेत आहे. या आजाराची लक्षणे दिसताच तातडीने डाॅक्टरांना दाखवावे़ तसेच मुलांना काेराेना हाेऊच नये यासाठी उपाय याेजना कराव्यात. काेरानातून मुले सावरली असली तरी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे.
डाॅ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक