संग्रामपूर तालुक्यात निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 04:30 PM2020-06-15T16:30:10+5:302020-06-15T17:17:07+5:30
निकृष्ट व बोगस सोयाबिन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तालुक्यातील बहुतांश गावात पेरणीला वेग आला असतनाच, निकृष्ट आणि बोगस बियाण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कपाशी बियाण्यात नफाखोरीसाठी शेतकºयांची अडवणूक केली जात असल्याचा प्रकार ताजा असतानाच आता निकृष्ट व बोगस सोयाबिन बियाणे शेतकºयांच्या माथी मारल्या जात असल्याचे दिसून येते.
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील सुधीर देऊकार यांनी चांगेफळ येथील एका कृषी केंद्रावरून ७ जून रोजी सोयाबीन बियाण्यांचे १० बॅग विकत घेतले होते. एका बॅगीत ३० किलो बियाणे असून याची किंमत २ हजार २४० रुपये आहे. शनिवारी रात्री वानखेड येथे समाधानकारक पाऊस पडल्याने रविवारी १५ जून रोजी सकाळी देऊकार यांनी विकत आणलेल्या १० बॅग पैकी ५ बॅग पेरणी साठी शेतात नेल्या. ट्रॅक्टरने पेरणीला सुरूवात केली. सुरुवातीच्या तीन बॅगमधील बियाण्यांची पेरणी करण्यात आली. चौथी बॅग फोडली असता त्यामध्ये बुरशी लागून असलेले बियाणे दिसून आले. पाचव्या बॅगमध्ये ही याच प्रकारे निकृष्ट बियाणे होते. सर्वत्र पेरणीची लगबग सुरू असल्याने तसेच पेरणीसाठी ट्रॅक्टर मिळत नसल्याची अडचण लक्षात घेता या शेतकºयाने त्या दोन्ही बॅगा मधील बुरशी युक्त निकुष्ट बियाणे वेगळे करून उर्वरित बियाण्यांमध्ये पेरणी आटपून घेतली. त्यानंतर त्या निकुष्ट बियाणे असलेल्या बॅगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. असाच प्रकार बावनबीर येथील दोन शेतकºयांसोबत काही दिवसांपूर्वीच घडला होता.
चांगेफळ येथील कृषी केंद्रावरून दहा जागा विकत आणले होते. त्यापैकी पाच बॅग पेरणीसाठी घेऊन गेलो असता यातील दोन बॅग मधील बियाण्यांना बुरशी लागलेली होती. कंपन्यांकडून निकृष्ट व बोगस बियाणे शेतकºयांची विक्री केली जात आहे. शेतकºयांची फसवणूक होऊ नये म्हणून व्हिडिओ व्हायरल केला. यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.
- सुधीर देऊकार
शेतकरी, वानखेड
शेतकºयाचा व्हायरल व्हिडिओ बघितला आहे. बॅगमध्ये बुरशी युक्त बियाणे दिसून येत असून बोगस बियाणे म्हणता येणार नाही. यासंदर्भात शेतकºयाच्या तक्रारीवरून चौकशी करण्यात येणार आहे.
- सी.पी. उंदरे, कृषी अधिकारी
पंचायत समिती कार्यालय संग्रामपूर
या संदर्भात शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास सोयाबीन बियाण्यांच्या लाॅट नंबर ची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी केल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.
- अमोल बनसोड
तालुका कृषी अधिकारी
संग्रामपूर