मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:41 AM2021-09-07T04:41:12+5:302021-09-07T04:41:12+5:30
मासिक पोषण आहार अभियान बुलडाणा : बालविकास शहरी प्रकल्प बुलडाणाअंतर्गत स्थानिक भीमनगर येथील पाच अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण महाअभियानाचे उद्घाटन ...
मासिक पोषण आहार अभियान
बुलडाणा : बालविकास शहरी प्रकल्प बुलडाणाअंतर्गत स्थानिक भीमनगर येथील पाच अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण महाअभियानाचे उद्घाटन सुपरवायझर वैशाली गिरी, मीना खिल्लारे, पोलीस अधिकारी सुरेश भिसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर अभियान अंगणवाडी केंद्रामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
बोराखेडीत ६०० जणांचे लसीकरण
बोराखेडी : प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडीअंतर्गत येत असलेल्या सर्व उपकेंद्रांवर तथा शहरात २ सप्टेंबर रोजी एका दिवसात विक्रमी असे १ हजार ६०० लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्यातील बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मोताळा, बोराखेडी, कोथळी, तरोडा, धामणगाव देशमुख, तिघ्रा, जनुना, राजूर, डिडोळा बु, डिडोळा खु. येथे लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
--
विशेष गौरव पुरस्कारासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा
बुलडाणा : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी अथवा पाल्य यांना एकरकमी १० हजार व २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी माजी सैनिक, पत्नी अथवा पाल्य यांच्यापैकी पात्र उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे १४ ऑक्टोबरपर्यंत येऊन आपली उमेदवारी नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.