शहापूर गावात काेराेनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:35 AM2021-03-31T04:35:15+5:302021-03-31T04:35:15+5:30
आरोग्य विभागाकडून वेळोवेळी कोरोना संदर्भातील त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी तोंडावर मास्क लावावे, वेळोवेळी हात धुणे, ...
आरोग्य विभागाकडून वेळोवेळी कोरोना संदर्भातील त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी तोंडावर मास्क लावावे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटाझरचा वापर करावा व कोणीही विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व शासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करून आरोग्य विभागाला मदत करावी, असे आवाहन करूनसुद्धा नागरिक नियमाचे पालन न करता बिनधास्तपणे तोंडावर मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. दाेन दिवसांपासून होळी सणामुळे दुकानांमध्ये तुफान गर्दी होती. याकडेसुद्धा नागरिक कोणत्याही सूचनेचे पालन करताना दिसले नाहीत. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राकडून नागरिकांना सूचना देऊन शासनाच्या सूचनेचे पालन करावे तरच कोरोनावर मात करता येईल, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांनी केले आहे.
ग्रामीण भागात वाढताहेत रुग्ण
मेहकर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. सोमवारी मेहकर तालुक्यातील मुंदेफळ, किन्ही, कळमेश्वर, आरेगाव येथे प्रत्येक एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. चिंचोली बोरे येथे दोन, कल्याणा येथे चार, करंजी, बोरखेडी, कासारखेड, शेंदला येथे एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे.