लॉकडाऊनमध्ये महागाईचा भडका, सर्वसामान्य त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:29+5:302021-04-29T04:26:29+5:30
काेराेनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत़ त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची पिळवणूक सुरू झाली ...
काेराेनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत़ त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची पिळवणूक सुरू झाली आहे़ शेतकऱ्यांना आपला भाजीपाला बाजार बंद झाल्याने विकता येत नसल्याचे चित्र आहे़ दुसरबीड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उन्हाळी भाजीपाल्याची लागवड केली़ मात्र, ते विकण्याकरिता कोराेना महामारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ भाजीपाल्याची योग्य वेळेमध्ये विक्री न झाल्यास त्याची नासाडी होत आहे तसेच सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याकरिता लागणारा किराणा महाग झाला आहे़ त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळामध्ये शेतीकरिता लागणारे साहित्य त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांमध्ये सिमेंट, लोखंड, विटांचे भाव भरमसाठ वाढले़ त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहेत़ अनेक लोकांना पावसाचे दिवस जवळ येत असल्यामुळे आपली कच्ची घरे दुरूस्त करण्याकरिता लोखंडी पत्रे, सिमेंट, दरवाजे विकत घ्यावे लागतात परंतु संचारबंदी लागू असल्यामुळे सर्वसामान्यांना या वस्तू घेणे कठीण होऊन बसले़ त्याचप्रमाणे अव्वाच्या सव्वा भाव घेऊन या वस्तू खरेदी करावा लागत आहे़ पेरणी हंगामाचे दिवस समोर येत असून शेतीची कामे शेतकऱ्यांना करावी लागतात परंतु त्याला लागणारे साहित्य महाग झाल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे़ एका बाजूला काेराेना महामारीचे संकट उभे असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत़