महागाईमुळे शेतीकामे अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:58+5:302021-05-16T04:33:58+5:30
अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या मशागतीकरिता बैलजोडी वापरणे शक्य नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी हे यांत्रिकी शेती करतात. मात्र यावर्षी डिझेलच्या ...
अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या मशागतीकरिता बैलजोडी वापरणे शक्य नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी हे यांत्रिकी शेती करतात. मात्र यावर्षी डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे ट्रॅक्टरने कामे करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. शेती कामाचे वाढलेले भाव, डिझेलचा भाव यामुळे ट्रॅक्टरचे सुद्धा भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आपल्या शेतामधील काम करण्याकरिता ट्रॅक्टरला जादा पैसे द्यावे लागत आहेत. शेतमजुराच्या मजुरीचे सुद्धा दर वाढले आहेत. महागडी खते आणि बियाणे वापरून शेतीमधील उत्पादनाचा भरोसा सांगता येत नाही. निसर्गावर अवलंबून असलेली शेती व्यवसाय शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरत आहे. बियाणे बाजारात विक्रीकरिता आले असून, त्यांच्या किमती सुद्धा वाढलेल्याच आहेत. बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती, शेतमजुरांची वाढलेली मजुरी डिझेल दरवाढीमुळे शेती मशागतीची वाढलेले दर अशी कठीण परिस्थिती शेतकरी सापडला आहे.