‘किसान सन्मान’साठी माहिती संकलन वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:26 PM2019-06-21T14:26:33+5:302019-06-21T14:27:12+5:30
जिल्ह्यात तहसिलस्तरावर पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सरसगट लाभ देण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यात तहसिलस्तरावर पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. दरम्यान ३० जून पर्यंत अनुषंगीक माहिती ही पीएमकिसनच्या संकेतस्तळावर अपलोड करण्याची मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रारंभीच्या पात्र शेतकऱ्यांपैकी सुमारे ७० हजार ४७८ शेतकºयांना योजनेतंर्गत दुसरा हप्ता निर्गमीत करण्यात आला आहे.
योजनेतंर्गत पात्र शेतकºयांचा संपूर्ण माहिती ही राष्ट्रीय स्तरावर संकलीत करण्यात येत असल्याने काही शेतकºयांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नसला तरी तो येत्या काळात त्यांना मिळेल, असे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीत येणाºया अडचणी व तांत्रिक बाबींसंदर्भात १९ जून रोजी केंद्रीयस्तरावरून व्हीसीद्वारे जिल्हास्तरावरील यंत्रणेला प्रशिक्षण स्वरुपात माहिती देण्यात आली आहे. या व्हीसीला निवासी उपजिल्हाधिकारी, नैसर्गिक आपत्ती कक्षातील कर्मचारी व तत्सम अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, असे सुत्रांनी स्पष्ट केले.
योजनेच्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हेक्टरपर्र्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर योजनेच्या निकषात काही बदल करण्यात येऊन सरसगट शेतकºयांना ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्ह्यात दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या जवळपास सव्वा लाख शेतकºयांनाही मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी वगळता नव्या परिपत्रकानुसार ही मदत देण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने तालुकास्तरावर सध्या पात्र शेतकºयांची यादी, त्यांचे आधारकार्ड, बँक खाते व तत्सम माहिती संकलीत करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
७० हजार शेतकºयांना दुसरा हप्ता
योजनेतंर्गत जिल्ह्यातील ७० हजार ४७८ शेतकºयांना १४ कोटी नऊ लाख ५६ हजार रुपयांचा हप्ता प्राप्त झाला आहे. यातील बहुतांश रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा झाली असल्याची माहिती आहे. पहिल्या हप्त्यात ७९ हजार ५८२ शेतकºयांना १५ कोटी ९१ लाख ६४ हजार रुपयांचा हप्ता मिळालेला आहे. मधल्या काळात निवडणुक असल्याने योजनेच्या संदर्भाने असलेल्या कामात काहीशी शिथीलता निर्माण झाली होती. परंतू आता पुन्हा अनुषंगीक विषयाने वेग धरला आहे. जिल्ह्यात योजनेसाठी पात्र असलेले प्रारंभीचे शेतकरी हे एक लाख १७ हजार ६१७ होते. त्यात आता वाढ अपेक्षीत आहे.
योजनेच्या अनुषंगाने माहिती संकलनाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. ३० जून पर्यंत संकलीत केलेली अद्यावत माहिती संबंधित संकेतस्थळावर अलोड करावयाची आहे. योजनेतंर्गत संकलीत केलेला डाटा हा राष्ट्रीय स्तरावर राहणार असल्याने पात्र शेतकºयांना अनुषंगीक मदत मिळेल.
- संतोष शिंदे, तहसिलदार, बुलडाणा