बाजार समितीची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:42+5:302021-08-14T04:39:42+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकरची स्थापना ३० जानेवारी १९७६ ला झाली. या समितीत एकूण २० सदस्यांचा समावेश आहे. येथील ...
कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकरची स्थापना ३० जानेवारी १९७६ ला झाली. या समितीत एकूण २० सदस्यांचा समावेश आहे. येथील मार्केट यार्ड परिसर ८.३० एकर आहे. त्यात एकून ४ गोडाऊन आहेत. या कार्यक्षेत्रात जवळपास एकूण १३९ खेड्यांचा समावेश आहे. या बाजार समितीत गहू, उडीद, मूग, हरभरा, तूर, सोयाबीन, ज्वारी, मका इत्यादी शेतमालाचा समावेश आहे. बाजार समितीत ४५० मजूर काम करीत असून, समितीच्या आवारात पिण्याचे पाणी, विश्रामगृह, हॉटेल व शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. वसु, कार्यक्रम आधिकारी प्रा. एस. टी. कवर व विषय शिक्षक प्रा. राम पदमने यांचे मार्गदर्शन लाभले.