विदर्भ राज्यासाठी पुढाकार

By admin | Published: July 20, 2014 01:22 AM2014-07-20T01:22:14+5:302014-07-20T02:03:47+5:30

चंद्रकांत वानखाडे यांचे ‘रेल देखो, बस देखो’ आंदोलनाचे बुलडाणा येथे सुतोवाच.

Initiative for Vidarbha State | विदर्भ राज्यासाठी पुढाकार

विदर्भ राज्यासाठी पुढाकार

Next

बुलडाणा : वेगळ्या विदर्भ राज्यासाठी झालेल्या मतदानात ९७ टक्के नागरीकांनी विदर्भाच्या बाजूने मतदान केले आहे. केवळ दिड टक्का लोकांनाच वेगळा विदर्भ नको आहे.आता सामान्य माणुसच रस्त्यावर उतरूण वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद जेष्ठ विचारवंत व ह्यजनमंच लढा विदर्भाचाह्ण या संघटनेचे मार्गदर्शक चंद्रकांत वानखेडे यांनी व्यक्त केला. येथील बुलडाणा अर्बन को.ऑप सोसायटीच्या सहकार सेतू सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मंचकावर अँड. अनिल किलोर, बापुसाहेब मोरे, अँड. अशोक सावजी, अँड.दिपक पाटील उपस्थित होते.
भुवनेश्‍वरच्या पक्ष अधिवेशनात १९९७ ला भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव घेतला होता. तर नितीन गडकरी यांनी विदर्भवाद्यांना लेखी देत विदर्भ राज्य झाले नाही तर प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्याची भाषा केली होती. मात्र, भाजपने आता घुमजाव केला आहे. आता म्हणतात निवडणुका होऊद्या पण, विधान सभा निवडणूकांच्या आधी आम्हाला वेगळा विदर्भ हवा आहे. त्यासाठी आता आमचा लढा सुरू झाला आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांतीच्या दिवशी विदर्भातील प्रत्येक बसस्थानक व रेल्वेस्थानकावर ह्यरेल देखो, बस देखोह्ण आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात बुलडाणा जिल्ह्यातील हजारोच्या संख्येनी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही यावेळी चंद्रकांत वानखेडे यांनी केले. बस स्थानक व रेल्वे स्थानकावर भजन- किर्तन करून आलेल्या प्रवाशांना स्वतंत्र विदर्भ राज्याचा ह्यविदर्भ बंधन धागाह्ण विदर्भवादी बांधतील असेही यावेळी त्यांनी सांगीतले. यावेळी जेष्ठ पत्रकार बापुसाहेब मोरे,अँड. दिपक पाटील, अँड. अशोक सावजी यांनी आपले विचार व्यक्त केले.

Web Title: Initiative for Vidarbha State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.