साहाय्यक आयुक्तांकडून वसतिगृहाची चौकशी

By Admin | Published: April 16, 2015 01:10 AM2015-04-16T01:10:57+5:302015-04-16T01:10:57+5:30

मेहकर येथील वसतिगृहाची पाहणीअंती अनेक ठिकाणी आढळल्या त्रुट्या.

Inquiries of hostels from the Assistant Commissioner | साहाय्यक आयुक्तांकडून वसतिगृहाची चौकशी

साहाय्यक आयुक्तांकडून वसतिगृहाची चौकशी

googlenewsNext

मेहकर (बुलडाणा): बुलडाणा समाजकल्याण विभागाचे साहाय्यक आयुक्तांनी १५ एप्रिल रोजी स्थानिक शासकीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलामुलींच्या वसतिगृहाची चौकशी केली. यामध्ये अनेक ठिकाणी त्रुट्या आढळून आल्या असून, चौकशीचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठवून कारवाई करण्यात येणार असल्याचे साहाय्यक आयुक्त यांनी सांगितले.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये निकृष्ट भोजन तथा सुविधांचा अभाव यासंदर्भात तक्रारी येत असल्याने आ. डॉ. संजय रायमुलकर व शिवसेना पदाधिकार्‍यांनी १३ एप्रिल रोजी दोन्ही वस ितगृहाला भेट दिली असता, वसतिगृहातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला होता. यासंदर्भात १५ एप्रिल रोजी लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच समाजकल्याण विभाग खळबळून जागा झाला.
दरम्यान, १५ एप्रिल रोजी समाज कल्याण विभागाचे सीहाय्यक आयुक्त नितीन ढगे, विशेष अधिकारी मनोज मेरत, समाजकल्याण निरीक्षक अरविंद मोहोड यांनी वसतिगृहाला भेट देऊन सर्व प्रकाराची तपासणी केली. यामध्ये जेवण व नाश्ता नियमाप्रमाणे देण्यात येत नाही. मार्च महिना असल्याने बिले निघण्यास उशिर झाल्याने विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता देण्यास व शालेय साहित्य खरेदी करण्यास विलंब झाला. यांसह इतरही प्रकरणात त्रुट्या आढळून आल्या. त्यामुळे सर्व प्रकरणांचा अहवाल तयार करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे नितीन ढगे यांनी सांगितले.

ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस
सदर वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जे जेवण व नाश्ता देण्यात येतो, तो नियमाप्रमाणे देण्यात येत नाही. अशा तक्रारी मागील वेळेतही आल्या होत्या. त्यावेळी संबंधित ठेकेदारांवर १0 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली हो ती, तर आतासुद्धा ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचे ढगे यांनी सांगितले.

Web Title: Inquiries of hostels from the Assistant Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.