डोणगाव येथील विलगीकरण कक्षाची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:28+5:302021-06-16T04:46:28+5:30

चौकशीनंतर अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोविड विलगीकरण कक्ष ग्रामपंचायतने कुणाच्या संमतीने ...

An inquiry will be held into the separation cell at Dongaon | डोणगाव येथील विलगीकरण कक्षाची होणार चौकशी

डोणगाव येथील विलगीकरण कक्षाची होणार चौकशी

Next

चौकशीनंतर अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोविड विलगीकरण कक्ष ग्रामपंचायतने कुणाच्या संमतीने सुरू केला. डोणगाव ग्रामपंचायतमध्ये १७ सदस्य असताना त्यांना विश्वासात का घेतले नाही व कक्षाकरिता जवळपास वस्तू व चेक तसेच नगदी रक्कम कुणाच्या नावाने जमा केली, यांसह अनेक प्रश्न माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी उपस्थित केले आहेत. ही रक्कम अडीच ते तीन लाख रुपये आहे. या खर्चाचे विवरण कुठे आहे, तसेच विलगीकरण कक्ष २० मे रोजी सुरू झाले. आजपर्यंत एकही रुग्ण यामध्ये आलेला नाही. कोविड विलगीकरण कक्ष सुरू करताना कोणाचे मार्गदर्शन घेतले होते का, या सर्व प्रकरणांची त्वरित चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

Web Title: An inquiry will be held into the separation cell at Dongaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.