पिकांवर पावसानंतर आता किडीचे संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:59+5:302021-07-11T04:23:59+5:30

बुलडाणा: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून पावसाच्या हजेरीने पिकांना संजीवनी मिळाली आहे. ...

Insect crisis now after rains on crops! | पिकांवर पावसानंतर आता किडीचे संकट !

पिकांवर पावसानंतर आता किडीचे संकट !

Next

बुलडाणा: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून पावसाच्या हजेरीने पिकांना संजीवनी मिळाली आहे. परंतु काही भागांत रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोयाबीनवरही ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव झाला असून, सोयाबीनच्या झाडाचे शेंडेच गायब होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मृग नक्षत्रात झालेल्या चांगल्या पावसावर जवळपास ६० टक्के पेरणी पूर्ण झाली होती. आता ६४ टक्के पेरणी झालेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पीक आहे. सध्या वातावरणातील बदलाने पिकांना कडीचा फटका बसत आहे. सोयाबीन पिकांमध्ये खोड पोखरणाऱ्या किडींमध्ये प्रामुख्याने खोडमाशी आणि चक्रभुंगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. इतर किडींच्या तुलनेत या दोन किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चक्र भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत, तर खोडमाशी मुळे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे या किडींचे वेळीच योग्य नियोजन करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या औषधांची फवारणी करत आहेत. सोयाबीन शिवाय मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, मिरची, कारली या पिकावरही ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव होत आहे. या किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

फवारणी करूनही जाईना कीड

चक्रभुंगा किडीचा प्रादुर्भाव हा सोयाबीनचे पीक साधारपणे २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताे. सध्या या किडीने सोयाबीनवर हल्ला केला आहे. ही अळी पानाच्या देठात अंड देते. तसेच ही कीड खोडात राहते. त्यामुळे फवारणी केल्यानंतरही या किडीचा प्रादुर्भाव लवकर जात नाही. त्यामुळे काही शेतकरी अनेकवेळा फवारणी करतात.

प्रादुर्भावाची लक्षणे...

झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले दिसते. पान फक्त सुकलेले असेल, तर चक्रभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते, तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असते तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंड्यातून लवकरच अळी निघण्याची स्थिती असेल. अंड्यातून ३ ते ४ दिवसांनी अळी बाहेर पडते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेचा वरील भाग सुकून नंतर वाळतो. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत.

या दिवसात खोडमाशी, खोडकीड, ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. थायामेथोक्झाम आणि लॅम्बडा सायहॅलोथ्रिन एकत्र चार मिली १० लिटर पाण्यात एका पंपाला देणे आवश्यक आहे.

डॉ. सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ

जिल्ह्यातील पेरणीची स्थिती (हेक्टरमध्ये)

एकूण नियोजन ७३४१७७

झालेली पेरणी ४६७१२४

सोयाबीन नियोजन ४०९२११

पेरणी २६६७०९

कपाशी १६८८६९

पेरणी १२६९२७

मूग १९२७५

पेरणी ९४४५

तूर ७६७१८

पेरणी ४३२१८

मका २०२३६

पेरणी ८९३७

Web Title: Insect crisis now after rains on crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.