दुपदरी मार्गाची पाहणी करा, अन्यथा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:48+5:302021-08-27T04:37:48+5:30
संबंधित कंत्राटदार व इंजिनिअर यांच्या संगनमताने हे रस्ते नियमाचे काम नियमानुसार आराखडाअन्वये होत नाही आहे, तसेच लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष ...
संबंधित कंत्राटदार व इंजिनिअर यांच्या संगनमताने हे रस्ते नियमाचे काम नियमानुसार आराखडाअन्वये होत नाही आहे, तसेच लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्याचा आकार हितसंबंध जपण्यासाठी कमी-अधिक करण्यात आला आहे. रस्त्याचा पृष्ठभाग खाली-वर अशा स्वरूपाचा झाला असल्याने त्रासदायक होत आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड नाराज आहेत. पोलीस स्टेशन ते खालचे बस स्टॅन्डपर्यंत आधी रुंद व मजबूत नाल्या दोन्ही बाजूने करणे क्रमप्राप्त असताना आधी रस्ता ( हे निकृष्ट दर्जाचा खालीवर असा ) तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हर ब्लॉक टाकणे, नाल्या बांधणे यासाठी निमुळती जागा ठेवण्यात आली आहे. या सर्व त्रुटींना कंत्राटदार जबाबदार आहे. एकतर येथे नवीन तहसील ऑफिस होत आहे. तेसुद्धा याच रस्त्यावर आहे. संत गजानन महाराज मंदिरसुद्धा याच रस्त्यावर आहे. तेथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला जातात. याच रस्त्यात सहा महाविद्यालय आहेत. विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. समृद्धी महामार्ग जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. भविष्यात मेट्रोसुद्धा याच महामार्गावरून होणार आहे. हा रस्ता पुढील ५० वर्षांसाठी होणारा आहे. हे डोळ्यासमोर ठेवून याचा विचार करण्यात यावा. रस्त्याचा मध्य काढून रस्ता करायला पाहिजे होता, पण तसे न होता दहा लोकांचे अतिक्रमण तसेच ठेवून दुसऱ्या बाजूने ( विरुद्ध दिशेने ) दहा लोकांनी केलेल्या अतिक्रमणसाठी लाखो लोकांच्या जिवाशी खेळणे योग्य ठरणार नाही. हा मेहकर शहराचा प्रमुख रस्ता आहे. रस्ता अरुंद राहिल्यास व दुभाजक न केल्यास मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरिक अपघाताचे बळीसुद्धा होऊ शकतात. या रस्त्यालगत मारुती मंदिर, शीतला माता मंदिर ही दोन मोठे मंदिरे आहेत. हा रस्ता जर नियमाने झाला तर मंदिरांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. हा रस्ता जर नियमबाह्य झाल्यास धार्मिक तेढ निर्माण होऊन लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. या कामात आपण व्यक्तिगत लक्ष द्यावे अशी लोकभावना असून, या मागणीसाठी १ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.