टिटवी येथील धरणाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:49+5:302021-07-11T04:23:49+5:30
संस्थेचे अध्यक्ष भगवानराव कोकाटे यांच्याशी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी चर्चा केली. त्यानंतर धरणाची पाहणी केली. तलावातून बाहेर शेतकरी बांधवांना ...
संस्थेचे अध्यक्ष भगवानराव कोकाटे यांच्याशी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी चर्चा केली. त्यानंतर धरणाची पाहणी केली. तलावातून बाहेर शेतकरी बांधवांना ज्या कॅनॉलने पाणी सोडले जाते, त्याचीसुद्धा पाहणी केली. बोटमध्ये बसून संपूर्ण तलावाची पाहणी करून तलावात असणाऱ्या टायगर कोलंबी, प्रॉन्स झिंगे तसेच कतला, रोहू, मिरगल, सायपरनिस, ब्रिगेड या माशांची माहिती उपायुक्त मत्स्य व्यवसाय अधिकारी सई नायकवाडे यांच्याकडून जाणून घेतली. या वेळी मत्स्य व्यवसाय उपायुक्त नायकवाडे यांनी या तलावातून उन्हाळ्यात कॅनॉलने पाणी सोडल्यानंतर तलावात पाणी खूप कमी होते. त्यामुळे दरवर्षी अनेक मासे मृत होतात, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या नियोजन निधीमधून सन २०१७- २०१८ मध्ये भेटलेल्या मत्स्यगंधा व्यवसाय या वाहनांची पाहणी केली व माहिती घेतली. या वेळी तहसीलदार हेमंत पाटील, मंडळ अधिकारी डव्हळे, तलाठी सचिन शेवाळे, मंदार तनपुरे, उपसरपंच ज्ञानेश्वर डोळे, संतोष राऊत, शेख चांद, रतन कोकाटे, उद्धव कोकाटे, एकनाथ डवरे, रामा डोळे आदी उपस्थित होते.
सिंचन पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी गैरहजर
टिटवी तलाव हा सिंचन पाटबंधारे विभाग लोणार यांच्या अधिपत्याखाली येतो. परंतु, जिल्हाधिकारी हे टिटवी तलावावर आले असता सिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी यावेळी हजर राहणे आवश्यक समजले नाही. जिल्हाधिकारी तलावावर येत असतानाही या विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर राहत नाहीत, तर इतर दिवशीची परिस्थिती वेगळीच असते.