रेल्वेमार्ग समितीकडून देऊळगाव राजात पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:26+5:302021-01-08T05:53:26+5:30
बुधवारपासून ही समिती जिल्ह्यात पाहणी करत आहे. गुरुवारी सकाळी समितीने देऊळगाव राजातील बाजार समितीची पाहणी केली. तेथे सचिव ...
बुधवारपासून ही समिती जिल्ह्यात पाहणी करत आहे. गुरुवारी सकाळी समितीने देऊळगाव राजातील बाजार समितीची पाहणी केली. तेथे सचिव किशोर म्हस्के यांनी समितीचे स्वागत केले. त्यानंतर पालिकेच्या सभागृहात समिती सदस्यांनी उद्योजक, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी प्रास्ताविकात समितीचा मूळ उद्देश स्पष्ट केला. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सुनीता शिंदे, उद्योजक ओमप्रकाश धन्नावत, मनीष काबरा, गजानन पवार, दादाराव खार्डे, ॲड. अर्पित मिनासे, दीपक बोरकर, सुरज गुप्ता, नंदन खेडेकर, एकनाथ काकड यांनी रेल्वे मार्ग का गरजेचा आहे, याबाबत विवेचन केले.
याप्रसंगी रेल्वे संघर्ष समितीतर्फे सन्मती जैन, गोविंद झोरे, जगदीश कापसे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या नावाने निवेदन सादर केले. राष्ट्रवादीतर्फे राजू सिरसाट, गणेश बुरकुल, नवनाथ गोमधरे, प्रदीप वाघ, काशीफ कोटकर, रामविजय नरोडे, काँग्रेसचे रमेश कायंदे, हनीफ शहा, अतिश कासारे, अर्जुनकुमार आंधळे, मुशीरखान कोटकर, राजेश पंडित, महम्मद जमील यांनी रेल्वेमार्गासाठी निवेदन सादर केले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहायक सचिन जाधव, बाजार समितीचे प्रशासक सुरज जगदाळे, नगरसेविका शारदा जायभाये, पल्लवी वाजपे प्रामुख्याने उपस्थित होत्या.