अतिपावसाने नुकसान झालेल्या शेताची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:51+5:302021-07-04T04:23:51+5:30
अतिपावसामुळे अंबाशी, सवडद, आमखेड, मोहाडी, रानअंत्री, लव्हाळा साखरखेर्डा गावांचा संपर्क तुटला होता. या अतिवृष्टीत नदीकाठचे पिके पूर्णता वाहून गेले ...
अतिपावसामुळे अंबाशी, सवडद, आमखेड, मोहाडी, रानअंत्री, लव्हाळा साखरखेर्डा गावांचा संपर्क तुटला होता. या अतिवृष्टीत नदीकाठचे पिके पूर्णता वाहून गेले आहेत. तर मोहाडी, माळखेड रस्त्यावर पूल नसल्याने पाचशे एकर जमीन पडीक असून हा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाने अंबाशी आणि आमखेड पाझर तलाव फुटल्याने कोराडी आणि भोगावती नदीला अचानक महापूर आला. दरम्यान तब्बल दहा वर्षांनंतर भोगावतीला महापूर आल्याने दोनशे मीटर दूरवरील शेताला तलावाचे स्वरूप आले होते. यामुळे लव्हाळा, साखरखेर्डा मार्ग रात्री नऊ वाजेपर्यंत बंद होता. पाण्याच्या प्रवाहाने ओढ्याचे पाणी खोळंबल्याने पीके उद्ध्वस्त झाली. आधीच दुबार पेरणी झाली असताना आता तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. माळखेड मोहाडी आणि पूल खचल्याने सवडद गजरखेड गावाचा संपर्क तुटला आहे. माजी आमदार तोताराम कायंदे यांनी यावेळी पाहणी करून शासन दरबारी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी शिवदास रिंढे, गजानन देशमुख, योगेश देशमुख, रमेश देशमुख, दिलीप काशीराव देशमुख आदी उपस्थित होते.