सुरा येथे ‘रोहयो’च्या फळबागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:10+5:302021-07-30T04:36:10+5:30
या कार्यक्रमात रोहयोचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, स्थापत्य अभियंता प्रमोद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरा येथे २०२१-२०२२ मध्ये एकूण ...
या कार्यक्रमात रोहयोचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, स्थापत्य अभियंता प्रमोद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरा येथे २०२१-२०२२ मध्ये एकूण २२ लाभार्थ्यांनी सुमारे २६ एकर क्षेत्रावर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत सीताफळाच्या रोपांची लागवड केली आहे. नवीन लागवड केलेल्या बागेची प्रातिनिधिक पाहणी भगवान बापूराव चेके यांच्या शेतात करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी क्षेत्रीय कर्मचारी विनायक मेहेत्रे यांनी एकच पीक अधिक क्षेत्रावर लागवड करण्याचा चांगला पुढाकार घेऊन शेतकऱ्यांमध्ये उत्साहवर्धक वातावरण तयार केल्याचे अभ्यागत पुस्तिकेत नोंदविले. याप्रसंगी तहसील कार्यालय देऊळगावराजा येथील संगणक ऑपरेटर सचिन सरकटे, गणेश तिडके, सहायक कार्यक्रमाधिकारी योगेश नाईकवाडे, तांत्रिक साहाय्यक, रोजगार सेवक ज्ञानेश्वर इजळे उपस्थित होते. शेतीशाळेला जिल्हा मासिक सत्राच्या चमूने भेट दिली. सरपंच सोपान चेके यांनी त्यांचे स्वागत केले. या चमूत विजय बेतीवार, कृषी उपसंचालक, बुलडाणा; अनंता झोडे, तंत्र अधिकारी व्ही. जी. राठोड, आर. के. मासळकर, काळे, तालुका कृषी अधिकारी दिघे, मंडळ कृषी अधिकारी सतीश दांडगे, विजय सरोदे, रवी राठोड, गोपाल बोरे, प्रवीण गाडेकर, कृषी पर्यवेक्षक देशमुख, मोरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विनोद खडसे, डॉ. वाय. व्ही. इंगळे, डॉ. पी. के. राठोड यांची उपस्थिती होती.
शेतीशाळेत रंगला संवाद
शेतीशाळेतील लाभार्थ्यांशी संवाद साधताना शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांमध्ये कौशल्यवर्धक बाबींचा विकास हा अत्यंत समाधानकारक असल्याचा शेरा अभ्यागत पुस्तिकेत नोंदविण्यात आला. शेतीशाळेला शास्त्रज्ञांनी संबोधित करताना किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही. तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारणीसाठी त्याची सजातीय प्रारूपे यावेळी स्पष्ट करण्यात आली. शेतीशाळा यशस्वितेसाठी विकास घुसळकर, राज्यस्तरीय रब्बी हंगाम पीक स्पर्धा तालुका स्तरांवरील तृतीय पारितोषिक प्राप्त सर्जेराव चेके, माधवराव नागरे, मनोहर चेके, ज्ञानेश्वर चेके, सुधाकर चेके, शंकर चेके, श्रीधर चेके, गजानन चेके, रंगनाथ चेके यांनी परिश्रम घेतले.