वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:09+5:302021-06-01T04:26:09+5:30

आधीच कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. आता खरीप हंगाम तोंडावर ...

Inspection of storm damage | वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी

वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी

Next

आधीच कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतीकामाची लगबग सुरू आहे. त्यातच २९ मे रोजी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दहिद बु. येथे अनेक घरांची पडझड झाली, काही घरावरील टिनपत्रे उडाले. येळगाव येथील ब्रह्मानंद गडाख यांच्या पोल्ट्रीफार्ममधील १ हजार ३०० गावरान कोंबड्यांचा बळी गेला. पोल्ट्रीफार्म व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा प्रपंच चालत होता. मात्र कोंबड्याच उरल्या नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी बु., उपकेंद्र अंभोडा येथील संरक्षक भिंत कोसळली आहे. जयश्री शेळके यांनी या भिंतीच्या दुरुस्तीचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. जयश्री शेळके यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. या वेळी पंचायत समिती सदस्य अमोल तायडे, विलास राऊत, चरणसिंग राजपूत, नाना जाधव, नीलेश राऊत, गणेश रिंढे, भगवान रिंढे, रामजी पवार, विष्णू पांडे, गणेश जाधव, ब्रह्मानंद गडाख, देविदास खोंडे, रामधन डुकरे, गजानन पवार आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Inspection of storm damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.