प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र बसवा; शेतकऱ्यांनी केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 01:39 PM2024-02-29T13:39:26+5:302024-02-29T13:39:34+5:30

स्वयंचलित हवामान केंद्राचा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार फटका

Install an automatic weather station in every village; Farmers demanded | प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र बसवा; शेतकऱ्यांनी केली मागणी

प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र बसवा; शेतकऱ्यांनी केली मागणी

२६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, या अवकाळी पाऊस व गारपीटीचे नोंद महसूल मंडळात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. कारण ज्या मंडळात एकच स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आले आहेत. मात्र, त्याच्या रेंजच्या बाहेर असणाऱ्या गावांना त्याचा फटका बसत आहे. व त्यामुळेच विमा कंपनी या अवकाळी पाऊस व गारपीट ची नोंद घेत नाही किंवा नेटवर्क प्रॉब्लेम मुळे फॉर्म अपलोड होत नाही. 

प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र बसवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर जिल्ह्यात एकूण ९२ मंडळ असून ९२ मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आले आहे. दोन ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्राची चोरी झाली असून, या हवामान केंद्राच्या २५ किलोमीटर पर्यंतची रेंज असते. यामध्ये नुकसानीची नोंद घेते ही नोंद महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कायमेट या संस्थेतर्फे कृषी विभागाला मिळते त्याच्या अनुषंगाने पीक विमा कंपनीला तो अहवाल पाठवून जे नुकसान झालेले क्षेत्र आहे, त्याला विमा संरक्षण देण्याचे तरतूद करतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी दिली आहे.

Web Title: Install an automatic weather station in every village; Farmers demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.