झटपट प्रसिद्धीची हौस संगीत क्षेत्राला मारक
By Admin | Published: April 24, 2015 01:33 AM2015-04-24T01:33:48+5:302015-04-24T01:33:48+5:30
परिचर्चेतील सूर; साधना व सरावातूनच घडतात कलावंत.
बुलडाणा : झटपट ग्लॅमर मिळविण्याच्या नादात अल्पशा ज्ञानावर संगीत स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा प्रकार अलिकडच्या काळात वाढला आहे. प्रचार प्रसिद्धीची विपुल झालेली साधने व अशा प्रकारे इन्सटंट कलाकार होण्याची इच्छा यामुळे संगीत सारखे क्षेत्र चांगल्या कलावंतांना मुकत असल्याची खंत बुलडाण्यातील संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली. लोकमत जिल्हा कार्यालयात गुरूवारी आयोजीत परिचर्चेत ही भावना व्यक्त झाली. बुलडाण्याचे संगीत क्षेत्र हे उज्जवल परंपरा असलेले क्षेत्र असुन या क्षेत्रातील अनेक गुरू शिष्यांच्या जोडया आजही रसीकांच्या स्मरणात आहेत. बदलत्या काळात मात्र ही परंपरा काही प्रमाणात खंडीत होत असल्याचे शल्य या चर्चेत अनेकांनी बोलुन दा खविले. झटपट प्रसिद्धी मिळविण्याची लालसा, कमी वेळात तज्ज्ञ होण्याची मह त्वाकांक्षा, सराव, साधना यांना फाटा देत स्टेज शो करण्याची धडपड या प्रकारामुळे संगीत क्षेत्रात चांगले कलावंत घडत नाहीत असे या चर्चेचा सुर होता. बुलडाण्यातील अनेक संगीत शिक्षकांकडे चांगले शिष्य तयार होत आहेत. जुन जाणते कलाकार आजही या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा सर्व कलाकारांना एकत्र करून कुणी राजाङ्म्रय दिला तर निश्चीतपणे संगीतक्षेत्राचे नवे पर्व सुरू होऊ शकते असा आशावाद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम सादर करण्यासाठी येणारा खर्च, कलावंतांना मिळणारी बिदागी याचे प्रमाण व्यस्त असल्याने मोठया कार्यक्रमांचे आयोजन होत नाही. एखाद्या संस्थेने या साठी पुढाकार घेतला तर आपल्या शहरातील कलाकारांना चांगले व्यास िपठ मिळेल अशी अपेक्षाही परिचर्चेत व्यक्त करण्यात आली. संस्कार भारती मार्फत कलावंतांसाठी सुरू केलेला उप्रकम हा लाभदायक आहे त्यामुळे शहरातील कलावं तानी त्यासाठी पुढाकार घेतला तरच त्याचे फलीत आहे, या क्षेत्रामध्ये नाव कमावायचे असेल, करीअर घडवायचे असेल तर साधना, सराव व रियाज महत्वाचा आहे व त्यासाठी जो तयारी ठेवली तरच कलावंत घडतील असा सुर या चर्चेचा होता.