पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:29+5:302021-09-08T04:41:29+5:30
मंगळवारी अतिवृष्टीमुळे बुलडाणा व मोताळा तालुक्यांतील शेतीचे व शेतपिकांचे, सुशिक्षित बेरोजगारांच्या दुकानगाळ्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ...
मंगळवारी अतिवृष्टीमुळे बुलडाणा व मोताळा तालुक्यांतील शेतीचे व शेतपिकांचे, सुशिक्षित बेरोजगारांच्या दुकानगाळ्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच दोन्ही तालुक्यांतील घरांची पडझड झालेली असून, विहिरीसुद्धा खचल्या आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्याबाबत महसूल यंत्रणेला तातडीने आदेश व्हावेत आणि बुलडाणा व मोताळा तालुक्यांतील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
--महसूल व पुनर्वसन मंत्र्यांशी चर्चा--
या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शासन स्तरावरून जिल्हा प्रशासनाला सर्वेक्षणाचे व नुकसानग्रस्तांना योग्य ती भरपाई देण्याबाबत निर्देश देण्याची विनंती केली असून, प्रस्तुत प्रकरणी त्यांच्याकडून सकारात्मकता दर्शविण्यात आलेली आहे.