जिल्ह्यातील आठ फळ पिकांना विमा संरक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:20 AM2017-10-07T01:20:46+5:302017-10-07T01:23:02+5:30
बुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या आठ फळ िपकांकरिता राबविण्यात येणार असून, योजनेंतर्गत फळ पीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे, तसेच गारपीट नुकसानाकरिता स्वतंत्र विम्याची मदत शेतकर्यांना मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या आठ फळ िपकांकरिता राबविण्यात येणार असून, योजनेंतर्गत फळ पीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे, तसेच गारपीट नुकसानाकरिता स्वतंत्र विम्याची मदत शेतकर्यांना मिळणार आहे.
आंबिया बहार व गारपीटमध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. गारपीटमध्ये ही योजना कर्जदार शेतकर्यांना सक्तीची असून, बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छीक आहे. योजना चार समूहांमध्ये राबविण्यात येणार आहे. समूह एक मध्ये इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, समूह दोन व तीनमध्ये एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व समूह चारमध्ये बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकर्यांना विमा हप्ता दर संरक्षित रकमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदश्री दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम शेतकर्यांनी भरावयाची आहे. उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार आहे. फळ पीक विमा योजनेत काही तालुके व महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये द्राक्ष या फळ पिकासाठी बुलडाणा तालुक्यातून मंडळ बुलडाणा, मोताळा तालुक्यातून बोराखेडी, जळगाव जामोद तालुक्यातून जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातून बावनबीर व सोनाळा या मंडळांचा समावेश आहे. मोसंबी या फळ पिकासाठी सिंदखेड राजा, सोनोशी, किनगाव राजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदूर्जन, साखरखेर्डा या मंडळांचा समावेश आहे.
डाळिंब फळ पिकासाठी चिखली, पेठ, चांधई, हातणी, धोडप, अमडापूर, एकलारा, उंद्री, कोलारा, शेलगाव अटोळ, मेरा खु., बुलडाणा, धाड, शेलापूर, बोराखेडी, मोताळा व धामणगाव बढे, पिंपळगाव काळे या मंडळांचा समावेश आहे. पेरू या फळ पिकासाठी साखळी बु., चिखली, हातणी व चांदई, मेहकर तालुक्यातून डोणगाव, हिवरा आश्रम, शेलगाव देशमुख या मंडळांचा समावेश आहे. केळी या फळ पिकासाठी बुलडाणा, बोराखेडी, मोताळा, पिंप्री गवळी, पिंपळगाव देवी, धामणगाव बढे, रोहिणखेड, जळगाव जामोद, बावनबीर, सोनाळा, संग्राम पूर, मेरा खु., हिवरखेड, काळेगाव, वझर, लाखनवाडा, पिं पळगाव राजा, डोणगाव, हिवरा आश्रम, वरवंड, जानेफळ, नायगाव द. या मंडळांचा समावेश आहे. संत्रा या फळ िपकासाठी डोणगाव, हिवरा आश्रम, जानेफळ, नायगाव द., मेहकर, शेलगाव देशमुख, बिबी, अंजनी खुर्द, सुलतानपूर, लोणार, हिरडव, आडगाव, लाखनवाडा, हिवरखेड, काळेगाव, वझर, बावनबीर व सोनाळा, शेंदूर्जन, साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, अंढेरा व दे.मही, जळगाव जामोद- जामोद या मंडळांचा समावेश आहे.
आंबा या फळ पिकासाठी सिंदखेड राजा या मंडळांचा समावेश आहे.
या योजनेनुसार कमी-जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सा पेक्ष आद्र्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकर्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. शेतकर्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अशा आहे प्रस्ताव सादर करण्याच्या मुदती
आंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळिंब या पाच फळ िपकांसाठी शेतकर्यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे ३१ ऑक्टोबर २0१७ पर्यंत सादर करावयाचे आहे. तसेच द्राक्ष फळ पिकाकरि ता १५ ऑक्टोबर, लिंबुकरिता १४ नोव्हेंबर, आंबा फळ िपकासाठी ३१ डिसेंबर तर संत्रा व काजू फळ पिकाकरिता ३0 नोव्हेंबर २0१७ पर्यंत प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत.