एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 16:44 IST2020-02-09T16:44:04+5:302020-02-09T16:44:26+5:30
लक्षांक मिळाला नसल्याने शेतकºयांच्या अर्जांवर निर्णय झाला नसल्याचे कळते.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी विविध लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. लक्षांक मिळाला नसल्याने शेतकºयांच्या अर्जांवर निर्णय झाला नसल्याचे कळते.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०१९-२०२० या वर्षासाठी खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अनेक शेतकºयांनी अर्ज केले. यात कांदाचाळ, शेडनेट, शेततळे अस्तरीकरणासाठी शेतकºयांनी अर्ज केले. एससी, एसटी या प्रवर्गासाठी असलेल्या या योजनेंतर्गत १ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या कांदा चाळीसाठी ८६ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. १० गुंठे जमिनीवर साडेचार लाख रूपयांचे शेडनेट देण्यात येणार असून यासाठी २ लाख २५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे.
शेततळे अस्तरीकरणासाठीही ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. गत वर्षात नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान अनेक शेतकºयांनी अर्ज केले. दरम्यान या सर्वच योजनांसाठी अद्याप लक्षांक आलेला नसल्याने अद्याप पुढील कार्यवाही होऊ शकलेली नाही.
चालु वर्षात गत २ फेब्रुवारी पासून पुन्हा अर्ज घेण्यात सुरूवात करण्यात आली. ७ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ६ फेब्रुवारी पर्यंत कांदाचाळीसाठी १०, शेडनेटसाठी ३ तर शेततळे अस्तरीकरणासाठी एका शेतकºयाने अर्ज केला असल्याची माहिती मिळाली.
लक्षांक आल्यानंतर होईल निवड !
योजनानिहाय शेतकºयांचा लक्षांक अद्याप प्राप्त झालेला नसल्याने शेतकºयांच्या निवडीबाबतचा प्रश्न प्रलंबित आहे. लक्षांक प्राप्त झाल्यानंतर मिळालेला लक्षांक व आलेल्या अर्जांची संख्या याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.