संपाची तीव्रता कायम!

By admin | Published: June 3, 2017 12:51 AM2017-06-03T00:51:48+5:302017-06-03T00:51:48+5:30

मेहकरात बाजार समिती बंद : विविध राजकीय पक्ष उतरले संपात

The intensity of the strike continued! | संपाची तीव्रता कायम!

संपाची तीव्रता कायम!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संपाचे शस्त्र उगारल्याने या संपाला सर्वच स्थरातून पाठिंबा मिळत आहे. मेहकर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी या संपाला पाठिंबा दर्शवित शासनाच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध नोंदविला. संपाच्या पहिल्याच दिवशी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवून सभापती माधवराव जाधव व त्यांच्या संचालकांनी उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन देऊन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करीत शेतकऱ्याच्या या संपाला पाठिंबा दर्शविला, तर शिवसेनेनेसुद्धा आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगितले. दरम्यान, शुक्रवारला संपाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्या व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संपाचे शस्त्र हाती घेऊन सरकारला शेतकऱ्यांच्या ऐक्याचे दर्शन घडविले.

Web Title: The intensity of the strike continued!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.