जळगाव जामोद येथे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:02 AM2017-12-08T00:02:25+5:302017-12-08T00:07:48+5:30

जळगाव जामोद : स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे शारीरिक शिक्षण विभागाकडून अमरावती विद्यापीठस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा ५ ते ७ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. 

Intercollegiate Archery Competition at Jalgaon Jamod | जळगाव जामोद येथे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा 

जळगाव जामोद येथे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा 

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सहभाग राज्य स्तरावर खेळण्याची संधी 

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे शारीरिक शिक्षण विभागाकडून अमरावती विद्यापीठस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा ५ ते ७ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. 
यामध्ये यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलडाणा व अकोला या पाच जिल्ह्यांच्या एकूण १५0 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
हा खेळ प्रकार जळगाव जामोद नगरीमध्ये तिसर्‍यांदा आयोजित करण्यात आला होता. धनुर्विद्या या खेळ प्रकारात तीन विभागात सामने खेळविले जातात. इंडियन, रिकर्व्ह व कम्पाउंड या सामन्यांचे विशेष आकर्षण म्हणजे रिकर्व्ह या खेळात आंतरराष्ट्रीय खेळाडू तुषार शेळके, प्रवीण जाधव व सुखमणी बारबेकर हे तिघेही पदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. इंडियन राउंड या खेळ प्रकारात गिरीश कुकडे के.एल. कॉलेज अमरावती यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याला ६२८ गुण मिळाले. विवेक बोथीकर वाशिम हा ६२७ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आला. रोशन सोळंके नांदगाव एकूण ६२३ गुणांसह तिसर्‍या स्थानी यश संपादन केले. महिला विभागात दामिनी बोरो हिने ५९९ गुण मिळवत पहिला क्रमांक मिळविला. मालविका पाल अमरावती हिने ५३९ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला. दुर्गा लांडकर शिरपूर जैन हिने ४८२ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. रिकर्व्ह धनुर्विद्या या खेळाडूंनी त्यांच्या खेळाला साजेसा खेळ करताना ७0 मीटर अंतरावरून खेळताना ६५0 गुण मिळवत तुषार शेळके याने प्रथम क्रमांक मिळविला. प्रवीण जाधवने ६४३ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला, तर सुखमणी बारबेकर याने ६३४ गुण मिळविले व तिसरे स्थान प्राप्त केले. मुलींमध्ये उन्नती राऊत बडनेरा हिने ५८८ गुण प्राप्त करत सुवर्णपदक मिळविले. प्राजक्ता कांटे हिने ४३१ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. अवंती काळकोंडे हिने ४१३ गुण मिळवत तिसरे स्थान मिळविले. कंपाउंड राउंड या खेळ प्रकारात पुरुष विभागात श्रीरंग सावरकर कारंजा लाड याने ६५0 गुण मिळवत अग्रस्थानी होता. द्वितीय स्थानावर सचिन पांथीने ५३३ गुण प्राप्त केले. खम्पा बासुमतारी याने ४0७ गुण घेऊन कांस्य पदकाचा मानकरी ठरला. मुलींच्या बाजूने श्‍वेता कोल्हे ६५८ गुण मिळवित प्रथम आली. रुचा देशमुख ६३७ दुसर्‍या क्रमांकावर आली, तर अनुजा महालक्ष्मे हिने ५९७ गुणांची कमाई केली व तिसर्‍या स्थानावर आली. सर्वच विजेत्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Intercollegiate Archery Competition at Jalgaon Jamod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.