इच्छुकांनी सुरू केल्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:30 AM2017-09-04T00:30:17+5:302017-09-04T00:31:30+5:30

नांदुरा: थेट जनतेमधून सरपंच निवडण्याची पहिलीच  निवडणूक होऊ घातली असून, इच्छुक उमेदवारांसह म तदारही यावेळी उत्साहित आहेत. तालुक्यातील १३ ग्राम पंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, १११ ग्रा.पं.  सदस्य निवडण्याकरिता १0,४५४ पुरुष व ९२१८ स्त्रिया  असे एकूण १९,६८३ मतदारांचा मतदान यादीत समावेश  आहे.

Interested initiatives | इच्छुकांनी सुरू केल्या हालचाली

इच्छुकांनी सुरू केल्या हालचाली

Next
ठळक मुद्देतालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक१९,६८३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: थेट जनतेमधून सरपंच निवडण्याची पहिलीच  निवडणूक होऊ घातली असून, इच्छुक उमेदवारांसह म तदारही यावेळी उत्साहित आहेत. तालुक्यातील १३ ग्राम पंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, १११ ग्रा.पं.  सदस्य निवडण्याकरिता १0,४५४ पुरुष व ९२१८ स्त्रिया  असे एकूण १९,६८३ मतदारांचा मतदान यादीत समावेश  आहे.
नांदुरा तालुक्यात एकूण ६५ ग्रा.पं. असून, या पैकी माहे  नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ पर्यंत मुदत संपणार्‍या १३ ग्रा. पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  
१ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपासून संबंधित गावांसाठी  आचारसंहिता लागू झाली आहे. नांदुरा तालुक्यात वडगाव  डिघी येथील सरपंच पद नामाप्र राखीव असून, ३ प्रभागा तील ७ सदस्यांकरिता १0२७ मतदार आहेत. 
निमगाव येथील सरपंच पद अनु. जमाती महिला राखीव  असून, ६ प्रभागात १७ सदस्यांकरिता ६३९१ मतदार आहे त. पातोंडा येथील सरपंच पद सर्वसाधारण असून, ३  प्रभागातील ९ सदस्यांकरिता ९६0 मतदार आहेत. तिकोडी  सरपंच पद अनु. जाती महिला राखीव असून, ३ प्रभागा तील ९ सदस्यांसाठी १0९८ मतदार आहेत. पिंप्री अढाव  सरपंच पद नामाप्र राखीव असून, ३ प्रभागातील ७  सदस्यांकरिता ८५९ मतदार आहेत. 
कोकलवाडी येथील सरपंचपद सर्वसाधारण असून, ३  प्रभागातील ७ सदस्यांकरिता ४५४ मतदार आहेत. दहिवडी  सरपंच पद नामाप्र महिला राखीव असून, ३ प्रभागातील ९  सदस्यांकरिता १,७५६ मतदार आहेत. तरवाडी सरपंच पद  नामाप्र महिला राखीव असून, ३ प्रभागातील ९ सदस्यांकरि ता २0११ मतदार आहेत. मुरंबा सरपंच पद सर्वसाधारण  असून, ३ प्रभागातील ९ सदस्यांकरिता १,१६४ मतदार  आहेत. 
माटोडा सरपंच पद सर्वसाधारण असून, ३ प्रभागातील ७  सदस्यांकरिता १00२ मतदार आहेत. वळती बु. सरपंच पद  अनु. जातीकरिता राखीव असून, ३ प्रभागातील ७  सदस्यांकरिता ८५२ मतदार आहेत. अवधा बु. सरपंच पद  नामाप्र राखीव असून, ३ प्रभागातील ७ सदस्यांकरिता  १0३९ मतदार आहेत. भोटा सरपंचपद सर्वसाधारणकरिता  राखीव असून, ३ प्रभागातील ७ सदस्यांकरिता १,0७0 म तदार आहेत.

असा राहील निवडणुकीचा कार्यक्रम
७ सप्टेंबर रोजी तहसीलदार निवडणूक सूचना प्रसिद्ध  करणार असून, उमेदवारी अर्ज भरणे १५ सप्टेंबर ते २२ स प्टेंबर, सकाळी ११ ते दुपारी ४.३0 या वेळात राहणार  आहे. छाननी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून  होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणे २७ सप्टेंबर रोजी दु पारी ३ पर्यंत, तर अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध व चिन्ह  वाटप २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ नंतर होणार आहे. मतदान  ७ ऑक्टोबर शनिवारी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0  पर्यंत होणार असून, सोमवार ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी  होणार आहे.

Web Title: Interested initiatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.