साक्षी वाघच्या कथेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:24+5:302021-05-17T04:33:24+5:30
लहानपणापासून लिखाणाची आवड असलेल्या साक्षी हिचे शालेय शिक्षण देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा येथे झाले़ शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन ...
लहानपणापासून लिखाणाची आवड असलेल्या साक्षी हिचे शालेय शिक्षण देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा येथे झाले़ शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिने अस्वलाचे संरक्षण या विषयावर कथा लिहिली़ वडोदरा वन्यजीव विभाग दि सेरेनिटी ट्रस्ट अहमदाबाद व अमेरिकेतील बियर ट्रस्ट इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२० कडक निर्बंधांमध्ये स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन ओन क्लॉथ बियर यावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ जगातील विविध देशासह भारतातून सुद्धा अनेक राज्यातून हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषेत कथा प्राप्त झाल्या होत्या़ यामध्ये साक्षी कैलास वाघ हिने इंग्रजीमध्ये लिहिलेल्या उपरोक्त कथेला सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार प्राप्त झाला आहे़ या कथेचा उपयोग ॲनिमेशन फिल्म च्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे़ शाळेतील मुलांसाठी वन्य प्राण्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने एक जनजागृतीपर ही कथा आहे .