इंटरनेट, काटरून्सला पसंती

By admin | Published: November 13, 2014 11:51 PM2014-11-13T23:51:55+5:302014-11-13T23:51:55+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील लोकमत सर्वेक्षण, मुलांचे भावविश्‍व बदत असल्याचे वास्तव.

Internet, cutters prefer | इंटरनेट, काटरून्सला पसंती

इंटरनेट, काटरून्सला पसंती

Next

बुलडाणा : मैदानी खेळापेक्षाही वय वर्षे १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या पसं तीला इंटरनेट व काटरून्स सोबतच मोबाईलसुद्धा उतरला आहे. पुस्तकांचे वाचन कमी होत असल्याचे दिसून येतानाच व्यवसाय म्हणून आजही डॉक्टरची भुरळ बालमनावर असल्याचे चित्र लोकमत सर्वेक्षणातून समोर आले आहे.
बुलडाणा शहरातील निवडक शाळांमधील वर्ग ५ ते ७ पर्यंंतच्या विद्या र्थ्यांना या सर्वेक्षणात प्रश्न विचारले असता हे चित्र समोर आले. तुम्हाला घरी कोण रागावतो, या प्रश्नावर ६0 टक्के मुले आई, ३२ टक्के मुले वडील, तर ८ टक्के मुलांनी कोणीच नाही, हे उत्तर दिले. आईच्या प्रेमाचा धाक सर्वांनाच आहे.
टीव्हीवरचा कोणता कार्यक्रम सर्वाधिक आवडतो, हे विचारल्यावर तब्बल ६८ टक्के मुलांनी कार्टून तर १५ टक्के मुलांनी चित्रपट, ११ टक्के मुलांनी मालिका व ६ टक्के मुलांनी गेम्स या पर्यायाची निवड केली. इंटरनेटचा वाढता वापर मुलांमध्येही होताना दिसत आहे. संगणक शिक्षण शाळांपासूनच मिळत असल्याने ६४ टक्के मुलांना इंटरनेटचा वापर माहीत आहे. ऑनलाईन गेम्स खेळण्यासाठीच हा वापर सर्वाधिक होतो, हे विशेष तर १२ टक्के मुलांनी नाही व २४ टक्के मुलांनी कधी कधी, असे उत्तर दिले.
त्याचप्रमाणे मोबाईल हाताळण्यामध्ये सर्वच बालक आता निष्णात झाले आहेत. तब्बल ७२ टक्के बालकांनी घरातल्या मोठय़ांचे मोबाईल घेऊन त्यावर गेम्स किंवा इतर अँप्सचा वापर केला आहे.
लहानपणापासून घराघरात मुलांवर अपेक्षांचे ओझे असते, त्यामुळे त्यांनी पुढे काय व्हावे, याचे बाळकडू पालकांकडून रोज मिळत असते, त्याचाच परिणाम म्हणजे या सर्वेक्षणात तुम्हाला काय व्हायला आवडेल, असे विचारले असता तब्बल ४८ टक्के बालकांनी डॉक्टर, हेच उत्तर लिहिले, २0 टक्के बालकांना इंजिनिअर व्हावे वाटते, प्रत्येकी ८ टक्के बालकांनी उद्योजक व शिक्षक तर ६ टक्के बालकांनी वकील होण्यासाठी पसंती दिली. प्रातिनिधीक स्वरूपात असलेल्या या सर्वेक्षणातून बालकांच्या बदलत्या भावविश्‍वाची ओळख यानिमित्ताने होत असून, येणारी पिढी ही टेक्नोसेव्ही होत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Internet, cutters prefer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.