कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाच्या संपर्कातील चौघांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:52 PM2020-06-02T17:52:15+5:302020-06-02T17:52:34+5:30
दुसरबीड येथील एका ढाव्याबरील तीन व पंक्चर काढणाऱ्या एका कामगारा आरोग्य विभागाने तपासणीसाठी बुलडाणा हलविले आहे.
दुसरबीड: यवतमाळमध्ये मृत्यू पावलेल्या एका कोरोना बाधीत ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या दुसरबीड येथील एका ढाव्याबरील तीन व पंक्चर काढणाऱ्या एका कामगारा आरोग्य विभागाने तपासणीसाठी बुलडाणा हलविले आहे. सदर ट्रक चालकाने दुसरबीड येथील एका ढाब्यावरून ३१ मे जेवणाचे पार्सल घेतले होते. मात्र रस्त्यामध्ये या ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. तो चालक पॉझिटिव्ह निघाला. ट्रक चालकाच्या सहाय्यकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर थेट व्हीडीओ कॉल करून किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ यांनी संबंधीत ढाब्याची खातरजमा केली. त्यानंतर तहसिलदार, ठाणेदार व आरोग्य विभागाच्या पथकाने या धाब्यावरील चौघांना बुलडाणा येथे आरोग्य तपासणीसाठी पाठवले आहे. यामध्ये दुसरबीड येथील एक, तढेगाव गाव येथील एक व केशव शिवणी येथील दोन अशा चौघांचा समावेश आहे.
दुसरबीड वरून नागपूर-औरंगाबाद हायवे जातो. सध्या हॉलेट बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतंर्गत माल घेवून जाणाºया ट्रक चालक व वाहन चालकांचे हाल होत आहे. दरम्यान, नागपूरकडे माल घेवून जाणाºया एका ट्रक चालकाने दुसरबीड येथील एका ढाब्यावरून ३१ मे रोजी जेवणाचे पार्सल घेतले होते. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचताच त्याची तब्यत खराब झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या ट्रक चालकाचा स्वॉब नमुन्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. यवतमाळ जिल्हा प्रशासनाने मृत चालकाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्याच्या क्लिनरच्या मदतीने काढले असता दुसरबीड येथील एका ढाब्यावरून त्यांनी जेवणाचे पार्सल घेतले होते, असे समोर आले. त्यामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासनाने बुलडाणा जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी प्रत्यक्ष व्हीडीओ कॉल करून संबंधित ढाबा तोच आहे का? याची खातरजमा केल्यानंतर तेथील चौघांना आरोग्य विभागाच्या मदतीने बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविले आहे.