गुंतवणूकदारांची फसवणूक : पतसंस्थेचे फरार अध्यक्ष, व्यवस्थापकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 02:51 PM2020-01-22T14:51:43+5:302020-01-22T14:51:51+5:30

पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात व व्यवस्थापक गणेश कचरुजी खंडागळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० जानेवारी रोजी औरंगाबाद येथून अटक केली.

Investors Fraud: Credit Society's President, Manager Arrested by police | गुंतवणूकदारांची फसवणूक : पतसंस्थेचे फरार अध्यक्ष, व्यवस्थापकास अटक

गुंतवणूकदारांची फसवणूक : पतसंस्थेचे फरार अध्यक्ष, व्यवस्थापकास अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/चिखली : खोटे व बनावट कॅश प्रकरणे तयार करुन ठेवीदारांची १ कोटी ४७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेले चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात व व्यवस्थापक गणेश कचरुजी खंडागळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० जानेवारी रोजी औरंगाबाद येथून अटक केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
खोटे व बनावट कॅश कर्ज प्रकरणे तयार करुन स्वत:च्या फायद्यासाठी ठेवीदारांच्या पैशातून १ कोटी ४७ लाख २० हजार ३२९ रुपयांची उचल करुन अपहार केल्याचा गुन्हा चिखली पोलिस स्टेशनमध्ये १२ जुलै २०१९ रोजी दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात (रा. राऊतवाडी चिखली), व्यवस्थापक सतीश प्रल्हाद वाघ, रोखपाल परमेश्वर सुखदेव पवार, राऊतवाडी शाखा व्यवस्थापक गणेश कचरुजी खंडागळे यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुलडाणा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास हस्तांतरित झाला. आजपर्यंत केलेल्या तपासाअंती उपरोक्त आरोपींनी ४ कोटी ३४ लाख ५८ हजार ८८ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून चारही आरोपी फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी संस्थेचे व्यवस्थापक सतीश वाघ व रोखपाल परमेश्वर पवार यांना अटक केली आहे. मात्र उर्वरित दोघे फरार होते.
संस्थाध्यक्ष दत्तात्रय खरात व गणेश खंडागळे औरंगाबाद परिसरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणाचे पोलिस उपअधिक्षक डी. बी. तडवी यांना मिळाली. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना विशेष व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर अंभोरे करीत आहेत. पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांच्या नेतृत्वात पोलिस उपअधिक्षक डी. बी. तडवी, पो.उपनिरीक्षक दिगंबर अंभोरे, रामु मुंढे, सरदार बेग, गजानन जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Investors Fraud: Credit Society's President, Manager Arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.