वळण रस्ता ठरतोय अपघातास आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:03+5:302021-07-26T04:31:03+5:30
शेतकऱ्याचे नुकसान, मदतीची प्रतीक्षा सिंदखेडराजा: सोसाट्याच्या वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शेडनेट उडून गेले होते. यामध्ये सावखेड तेजन ...
शेतकऱ्याचे नुकसान, मदतीची प्रतीक्षा
सिंदखेडराजा: सोसाट्याच्या वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शेडनेट उडून गेले होते. यामध्ये सावखेड तेजन येथील शेतकरी सुरेश किसन मांटे यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदतीची प्रतीक्षा आहे.
शिधापत्रिकाधारकांची आधार जोडणी बाकी
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात एकूण चार लाख ८८ हजार ९५१ शिधापत्रिका आहेत. शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबातील सदस्यांची आधार जोडणी आणि ई-केवायसी प्रलंबित असलेल्या १८ हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आलेल्या आहेत.
राजूर घाटात वाहतुकीची काेंडी
बुलडाणा : बुलडाणा-मोताळा मार्गावरील राजूर घाटात वाहतुकीची कोंडी हाेत आहे. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्याने वाहन चालविणे धोक्याचेच आहे.
क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीमुळे रस्त्याची वाट
अंढेरा: परिसरातील रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. येथून गेलेल्या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले हाेते. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही.