५७५ गावांमध्ये १७ हजार हेक्टरवर सिंचन

By Admin | Published: September 16, 2016 02:58 AM2016-09-16T02:58:16+5:302016-09-16T02:58:16+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील जलयुक्त शिवारचा आढावा; ३३0 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड.

Irrigation in 1775 hectares of 575 villages | ५७५ गावांमध्ये १७ हजार हेक्टरवर सिंचन

५७५ गावांमध्ये १७ हजार हेक्टरवर सिंचन

googlenewsNext

बुलडाणा, दि. १५जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, यामुळे १७ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेच्या संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. खा. प्रतापराव जाधव व जिल्हाधिकारी विकास झाडे यांच्या उपस्थितीत जलयुक्तच्या कामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानानुसार जलसंधारण व मृदसंधारणाचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील ३३0 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली, तसेच दुसर्‍या टप्प्यात २४५ गावे निवडण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ३३0 गावांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू असून, ६ हजार ४५४ कामे पूर्ण झाली, तर ४२५ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर आतापयर्ंत ११७ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. त्याचप्रमाणे दुसर्‍या टप्प्यात ६६ कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर मोठ्या प्रमाणावर साखळी सिमेंट नाला बांधण्यात आले. अशाप्रकारे जिल्ह्यात ३६५ साखळी सिमेंट नाला बांधांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे १८२५ टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यावर्षीच्या समाधानकारक पावसामुळे सर्व बंधारे भरून वाहत आहेत, तसेच मागील वर्षात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे, खोलीकरण व रूंदीकरणाची कामे करण्यात आली. ती सर्व नदी- नाले, बंधारे आता ओसंडून वाहत आहेत. एकंदरीतच या अभियानामुळे जिल्ह्यात ४0 हजार १६७ टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला असून, ३३ हजार २८ हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. तर १७ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेचे संरक्षित सिंचन होऊ शकणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हे अभियान शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रामुख्याने नाला, ओढा, नदी यामधील गाळ काढणे, खोलीकरण, रुंदीकरण करणे अशी कामे लोकसहभागातून झालेली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१५-१६ मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १३९६ गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये एकूण ३३ हजार २५५ कामे पूर्ण झालेली आहेत. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत सन २0१६ - १७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, या गावामध्ये कामे सुरू आहेत. जनमाणसांचा, शेतकर्‍यांचा विकास साधावा, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील अन्नदात्याला सोसावा लागू नये, यासाठी जलयुक्तची संकल्पना महाराष्ट्रात राबविली जात आहे.

Web Title: Irrigation in 1775 hectares of 575 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.