वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी होणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:05 AM2017-10-30T00:05:00+5:302017-10-30T00:06:34+5:30

वरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार आहे. 

Irrigation areas will be reduced under the wan project | वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी होणार! 

वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी होणार! 

Next
ठळक मुद्दे१९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले आहेया प्रकल्पाचे पाणी अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना जाणार 

लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार  असून, बुलडाणा जिल्हय़ातील १४0 गाव पाणीपुरवठा योजनें तर्गत  कामे अपूर्ण असल्याने या गावांची पाण्याची प्रतीक्षा कायम  आहे. 
संग्रामपूर तालुक्यातील वान नदीवर वान प्रकल्प झाल्याने  काठावरील गावांच्या जलपातळीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याने  सिंचन क्षेत्र घटले व पाणी टंचाईचा सामना करावा लागत  आहे.हनुमान सागर या नावाने ओळखल्या जात असलेल्या वाण  प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अकोट व  तेल्हारा या दोन्ही तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी पाणीपुरवठा  केला जावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीने शासन  दरबारी करून सतत पाठपुरावा केल्याने असल्याने अखेर २६  ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अकोट व तेल्हारा या दोन्ही तालु क्यातील १५९ गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत शासन निर्णय  धडकला. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील जनतेला वाण धरणातून  पाणीपुरवठा केला जाणार आहे. 
परिणामी या तालुक्यातील १९६ हेक्टर जमीन रब्बी हंगामातील  सिंचनापासून वंचित राहणार आहे. हा पाणीपुरवठा हनुमान सागर  जलाशयातून ३.७५३ दलघमी केला जाणार असून,कालवा क्र .  २६0 द्वारे हे पाणी निगर्मित केले जाणार आहे. तर बुलडाणा  जिल्हय़ातील जळगाव जा, संग्रामपूर तालुक्यातील जनता  क्षारयुक्त पाणी पित असल्याने किडनी आजारात मोठय़ा प्रमाणात  वाढ होत आहे. १४0 गाव योजनेची कामे बाकी असल्याने  अनेक गावांना हक्काच्या वाण धरणातील पाणी अद्याप मिळत  नसल्याचे दिसून येते. बुलडाणा जिल्हय़ातील वान धरणाचे ह क्काचे पाणी अकोला जिल्हय़ात पळविले जात असताना  जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याने ह क्काच्या वाण धरणातील शुद्ध पाण्यापासून वंचित असलेल्या  जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, नाराजीचा सूर निघत  आहे. संग्रामपूर तालुक्यातील १४0 गाव पाणीपुरवठा योजना  मंजूर असून, टाकीचे बांधकाम झाले. पाइपलाइनचे कामही  बर्‍याच प्रमाणात झाले; पण वाण धरणातून पाणी संबंधित गावात  केव्हा पोहचणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागून आहे.

Web Title: Irrigation areas will be reduced under the wan project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी