सिंचन अनुशेषासोबतच कर्मचाऱ्यांचाही अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:40 PM2020-09-30T12:40:10+5:302020-09-30T12:40:22+5:30

एकीकडे सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी कर्मचाºयांचा अनुशेष भरून काढण्यासंदर्भातील कार्यवाही थंड बस्त्यात आहे.

Irrigation backlog as well as staff backlog | सिंचन अनुशेषासोबतच कर्मचाऱ्यांचाही अनुशेष

सिंचन अनुशेषासोबतच कर्मचाऱ्यांचाही अनुशेष

googlenewsNext

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: एकीकडे जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असताना पाटबंधारे विभागांतर्गत प्रत्यक्ष जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी राबणाºया कर्मचाऱ्यांचाही अनुशेष असल्याचे वास्तव आहे. एकीकडे सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी कर्मचाºयांचा अनुशेष भरून काढण्यासंदर्भातील कार्यवाही थंड बस्त्यात आहे.
गेल्या सात वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थापित सिंचन क्षमतेचाही पूर्ण कार्यक्षमतेने वापर करण्यात अडचणी आहेत. परिणामी, जिल्ह्यातील तीन मोठ्या, सहा मध्यम व ८१ लघु प्रकल्पावरील कालवे, पाट आणि सºयांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न मात्र कायम आहे. विशेष म्हणजे अवघे ५७ कर्मचारी ७५३ किमी लांबीच्या या मुख्य कालव्यांसोबतच अंतर्गत पाट आणि सºयांची देखभाल करत आहे. शेती सिंचनाची महत्त्वाची जबाबदारी असलेला हा सिंचन विभागाच कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे एक प्रकारे कोरडा पडल्याचे चित्र आहे.
मुळात बुलडाणा पाटबंधारे विभागात आकृतीबंधानुसार जेथे ४९० कर्मचारी हवे आहे तेथे प्रत्यक्षात २१८ कर्मचारी कार्यरत आहेत तर तब्बल २७२ कर्मचाºयांचा अनुशेष असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने प्रत्यक्ष सिंचन करण्यासाठी कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा टपाली आणि कालवा चौकीदार या कर्मचाºयांची महत्त्वाची भूमिका राहते; मात्र हीच पदे रिक्त असल्याने स्थापित सिंचन क्षमतेचाही जिल्ह्यात वापर होत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी जिगाव प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी जोर लावण्यात येत आहे. तर प्रत्यक्षात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असतानाही त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे चित्र आहे.
आॅक्टोबर महिन्यात पाणी आरक्षण समितीची बैठक होत आहे. त्यात सिंचनासाठी तथा पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात येईल. ही बैठक वेळेत होईलही; पण प्रत्यक्षात शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्यानंतर ज्या कालवे, पाट आणि सºयांद्वारे ते दिले जाईल, त्याच दुरुस्त झालेल्या नसतील तर उपलब्ध पाण्याचा काय उपयोग? त्यामुळे रिक्तपदे भरण्याची गरज आहे.

Web Title: Irrigation backlog as well as staff backlog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.