नंदनवन अनाथालयासाठी सरसावले हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 03:47 PM2019-07-21T15:47:41+5:302019-07-21T15:47:49+5:30

बुलडाणा येथील पाटबंधारे विभागाने गहू, दाळ, तांदूळ, तेल अन्न-धान्याची निराधार बालकांकरीता नंदनवन परिवारास मदत करून एक आदर्श उपक्रम निर्माण केला आहे.

Irrigation department come forward to help orphanage house |  नंदनवन अनाथालयासाठी सरसावले हात!

 नंदनवन अनाथालयासाठी सरसावले हात!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अनेक निराधारांना आधार देणाऱ्या बुलडाणा तालुक्यातील साखळी येथील नंदनवन आश्रमासाठी मदतीचे हात सरसावल्याचे चित्र दिसून येत आहे. बुलडाणा येथील पाटबंधारे विभागाने गहू, दाळ, तांदूळ, तेल अन्न-धान्याची निराधार बालकांकरीता नंदनवन परिवारास मदत करून एक आदर्श उपक्रम निर्माण केला आहे.
बुलडाणा-चिखली रोडवरील साखळी फाट्यापासून एक कि़मी. अंतरावर असलेल्या नंदनवन अनाथालय आहे. याठिकाणी होतकरू, गरजू, अनाथ, वंचित, उपेक्षित, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची, भूमिहीन शेतमजूरांची अपघातग्रस्त व्यक्तींची, भिक्षा मागणारी बालके आवडीने शिक्षण घेत आहेत. या अनाथालयासाठी बुलडाणा पाटबंधारे विभागाने गहू, तांदूळ, दाळ, तेल आदी अन्न-धान्याची शुक्रवारी मदत दिली.
अधिकारी, कर्मचाºयांचा आदर्श पुढाकार
बुलडाणा येथील पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी स्वत: च्या खिशातून नंदनवन अनाथालयास मदत करून एक सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचाºयांचा हा आदर्श पुढाकार इतर शासकीय विभागांसाठी प्रेरणादायी आहे. हा सामाजिक उपक्रम अधिक्षक अभियंता अंकर देसाई व कार्यकारी अभियंता कन्ना यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात आला. या सामाजिक उपक्रमात विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग घेतला होता. यामुळे मुलांसोबत काही क्षणही या कर्मचाºयांनी घालवला.

Web Title: Irrigation department come forward to help orphanage house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.