सिंचन योजना घोटाळा; एकाच लाभार्थ्याला दोन वेळा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 03:09 PM2019-12-18T15:09:52+5:302019-12-18T15:10:20+5:30

लोकमत’ने बुलडाणा जिल्हयात राबविण्यात आलेल्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील घोटाळा उघड केल्यानंतर अनेक गावात झालेला गैरप्रकार समोर येत आहे.

Irrigation scheme scam; Double benefit to the same beneficiary! | सिंचन योजना घोटाळा; एकाच लाभार्थ्याला दोन वेळा लाभ!

सिंचन योजना घोटाळा; एकाच लाभार्थ्याला दोन वेळा लाभ!

Next

- योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शासकीय योजनेचा एकदा लाभ घेतल्यानंतर एकाच लाभार्थ्याला पहिल्यांदा ‘आॅफलाई़न’ व दुसऱ्यांदा ‘आॅ़नलाई़न’ लाभ दिला गेल्यााचा प्रकार पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्हयातील संग्रामपूर, खामगाव व नांदुरा तालुक्यात झाला आहे. लाभ दिलेल्या शेतकºयासोबत हातमिळवणी करीत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल तर केलीच आहे. शिवाय अर्ज केलेल्या गरजू इतर शेतकºयांनाही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचे दिसून येते. ‘लोकमत’ने बुलडाणा जिल्हयात राबविण्यात आलेल्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील घोटाळा उघड केल्यानंतर अनेक गावात झालेला गैरप्रकार समोर येत आहे. शेतकºयांचे आर्थीक उत्पन्न वाढावे यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांना योजनेत समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने आॅफलाईन योजना पहिल्यांदा सुरु केली. मात्र योजनेत पारदर्शकता यावी व शेतकºयांना सहज अर्ज भरता यावा यासाठी आॅनलाईन अर्ज प्रणाली अंमलात आणली. त्याचा दुरुपयोग होऊन आधी लाभ घेतलेल्यांनाही लाभ दिला गेल्याचे समोर येत आहे.

याठिकाणच्या शेतकºयांनी घेतला दुसºयांदा लाभ
खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी, अडगाव, अंबिकापूर, अंत्रज, भालेगाव, पिंपळगाव राजा, भेंडी, दिवठाणा, काळेगाव, कोंटी, कुंबेफळ, कंचनपूर, कंझारा, कुंबेफळ, रोहणा, लाखनवाडा, लांजूळ, निमकवळा, नायदेवी याठिकाणच्या काही शेतकºयांनी दुसºयांदा योजनेचा लाभ घेतला आहे. तर नांदुरा तालुक्यातील अलमपूर, आंबोडा, चांदूरबिस्वा, चिंचखेड, बेलुरा, धानोरा, दहिवडी, डिघी, डोलखेड, इसबपूर, जिगाव, महाळूंगी, वडनेर, माळेगाव, वसाडी, रसूलपूर याठिकाणी सुद्धा २०१२ ते २०१७ दरम्यान लाभ घेतलेल्या अनेक शेतकºयांनी पुन्हा योजनेचा लाभ घेतला आहे.
याशिवाय संग्रामपूर तालुक्यातील अकोली बु, खुर्द, अटकळ, आलेवाडी, बानोदा, एकलारा, बिलखेड, बोडखा, भोन, चोंडी, धामणगाव, काकोडा, खिरोडा, लोहगाव, पळशी झाशी, मारोड, रिंगवाडी, रुधाणा, तामगाव, टूनकी, वरवटबकाल, वरखेड, वसाडी येथील १६० पेक्षा जास्त शेतकºयांनी दुसºयांदा ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेत शासनाची दिशाभूल केली आहे. यामध्ये प्रामुख्याने या संबधित शेतकºयांना लाभ मिळवून देण्यासाठी ज्या कृषी सहाय्यकांसह कृषी अधिकाºयांनी सहकार्य केले या सर्वांविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे.


पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत जिल््हयात चांगले काम झाले आहे. क्षेत्रफळानुसार शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. योजना राबवितांना नियम व अटी शर्तींचा भंग केलेला नाही. काही ठिकाणी असा प्रकार घडला असल्यास निश्चित चौकशी करण्यात येईल.
- नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी, बुलडाणा.

 

Web Title: Irrigation scheme scam; Double benefit to the same beneficiary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.