केवळ चार हजार हेक्टरवर होणार सिंचन

By admin | Published: November 13, 2014 11:56 PM2014-11-13T23:56:38+5:302014-11-13T23:56:38+5:30

खामगाव तालुक्यात सिचनात घट, अल्प पावसाचा खरिपासोबत रब्बीलाही फटका.

Irrigation will be done on only 4 thousand hectares | केवळ चार हजार हेक्टरवर होणार सिंचन

केवळ चार हजार हेक्टरवर होणार सिंचन

Next

खामगाव (बुलडाणा) : यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे तालुक्यातील धरणे तुडूंब भरली नसल्याने जलसाठा खालावला आहे. पाटाच्या पाण्यावर रब्बी हंगाम होणार असून खामगाव तालुक्यात केवळ चार हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन सिमीत राहणार आहे. खरीपासोबत रब्बीलाही अल्प पावसाचा फटका बसणार आहे. गेल्या ४ ते ५ वर्षापासून पावसाळा कमी जास्त होत असल्याने तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र कमालीचे घटत आहे. गतवर्षी १00 टक्के पावसाळा असल्याने तालुक्यातील धरणाने ८ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षाही रब्बी तसेच उन्हाळी पिकांना पाणी पुरविले. रब्बीचा गहू व हरभरा तर उन्हाळी भुईमुंग तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पिकला. मात्र यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने शेतकर्‍यांचा खरीप हंगाम प्रथमच हातचा निघून गेला. पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पार खचला आहे. खरीपात झालेली हानी भरून काढण्याची संधी रब्बी हंगामात मिळते. मात्र यावर्षी दमदार पावसाअभावी या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. खामगाव तालुक्यात मन, तोरणा, मस, ज्ञानगंगा व ढोरपगाव या धरणातील पाण्यावर सिंचन केले जाते. मन प्रकल्प हा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून याची जलाशय क्षमता ३८.८३ दलघमी आहे. तर ज्ञानगंगा ३३.९३, तोरणा ७.९0, ढोरपगाव ५.८३, व मस १५.0४ दलघमी आहे. या अपुरा पावसाळा झाल्याने सद्यास्थितीत मनमध्ये ५३ टक्के, तोरणा २0 टक्के, ढोरपगाव ७८ टक्के, ज्ञानगंगा ७0 टक्के तर मसमध्ये सर्वात जास्त म्हणजे ९१ टक्के जलसाठा आहे. धरणामध्ये जलसाठा कमी असल्याने सिंचनाचे नियोजनबध्द सिमीत होणार आहे. ३ हजार ४00 हेक्टर क्षेत्रापर्यंंत रब्बीसाठी पाणी देण्यात येणार आहे.

Web Title: Irrigation will be done on only 4 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.