‘मन’धरणातील पाणी पुरवठ्यात खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:26 PM2018-11-12T17:26:17+5:302018-11-12T17:26:27+5:30

खामगाव :  वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने, मन धरणातील आरक्षीत पाण्याचा उपसा करण्यात तांत्रिक पेच निर्माण झाला आहे.

irruption in water supply from man river dam | ‘मन’धरणातील पाणी पुरवठ्यात खोळंबा!

‘मन’धरणातील पाणी पुरवठ्यात खोळंबा!

Next

- अनिल गवई

खामगाव :  वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने, मन धरणातील आरक्षीत पाण्याचा उपसा करण्यात तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. परिमाणी, आगामी काळात खामगाव शहराचे जलसंकट आणखी गडद होणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या दशकापासून वाढीव पाणी पुरवठा योजनेचा तिढा सुटत नसल्याने शहराला पाणी पुरवठा करताना पालिकेची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते.

सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील मन धरणातील पाणी खामगाव शहरासाठी आरक्षीत करण्यात आले आहे. मात्र, वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने, मन धरणातील पाण्याचा उपसा करण्याचा तांत्रिक तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात खामगाव शहरातील जलसंकट बिकट होणार असल्याचे दिसून येते.

मन धरणातील १.८७ द.ल.घ.मी. पाणी आरक्षीत!

खामगाव शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी सद्यस्थितीत गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणातून १.१७ द.ल.घ.मी. तर शिर्ला नेमाने येथील मन धरणातून १.८७ द.ल.घ.मी. पाणी आरक्षीत करण्यात आले आहे. गेरू माटरगाव येथील धरणातील पाणी उचल करणे सहज शक्य आहे. मात्र, वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने,  मन धरणातील पाण्याची उचल करणे सद्यस्थितीत अशक्य आहे. ज्ञानगंगा धरणात ३.४५ तर मन धरणात १० द.ल.घ.मी पाणीसाठा उपलब्ध आहे.

वाढीव पाणी पुरवठा योजनेचा  तिढा सुटेना!

खामगाव शहरासाठी संजिवनी ठरणाºया वाढीव पाणीपुरवठा योजनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे संकेत आहेत. वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या २.२ मिलोमीटर पाईपलाईनचे काम अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे मन धरणावरील जॅकवेल, जॅकवेल ब्रीज अपूर्ण आहे. याठिकाणी विद्युत व्यवस्था आणि पंपींग मशिनरीही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे मन धरणात पाण्याचा साठा उपलब्ध असला तरी, या पाण्याची उचल करण्याचा पेच प्रशासनासमोर आहे. ही व्यवस्था पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाला जलशुध्दीकरण केंद्रावर पाणी आणण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागेल.

 

खामगाव शहरातील जलसंकट दूर करण्यासाठी खामगाव तालुक्यातील गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणासोबतच शिर्ला नेमाने येथील मन धरणातील पाणी आरक्षीत करण्यात आले आहे. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत.

- नीरज नाफडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, खामगाव.

Web Title: irruption in water supply from man river dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.