निराधार झालेल्यांना ईश्वेद देणार आधार -संजय वायाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:22+5:302021-06-06T04:26:22+5:30
सिंदखेडराजा: कोरोना महामारीत बरीचशी कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक घरातील कमवती माणसं दगावली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबं उघड्यावर पडली ...
सिंदखेडराजा:
कोरोना महामारीत बरीचशी कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक घरातील कमवती माणसं दगावली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबं उघड्यावर पडली आहेत. अशा ५० कुटुंबातील एका सदस्याला ईश्वेद बायोटेक कंपनी नोकरी देणार आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी दिली आहे.
ईश्वेद बायोटेक ही कंपनी शेतीशी संबंधित असल्यामुळे कोरोना संकटात आधार गमावलेल्या कुटुंबातील अशिक्षित व्यक्तीलाही नोकरी देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना कुटुंबांचा खर्च भागविता येणार आहे. पीडित कुटुंबाचा खूप मोठा ताण कमी होणार आहे.
खरंतर, कोरोना संकटात सापडलेल्यांना आधार देण्याचा विचार वायाळ हे गत काही महिन्यांपासून करत होते. अखेर, त्यांनी कोरोना संकटात सापडलेल्यांना नोकरी देण्याचा सर्वोत्तम निर्णय घेतला. ज्या शेतकऱ्यांचे कोणी वाली नाही, त्यांना सक्षम करण्यासाठी ईश्वेदची स्थापना झाली आहे. तसेच, महिलांना रोजगार देऊन त्यांना खंबीर बनविण्याचे कामही ईश्वेदने केले आहे. पीडित कुटुंब किंवा सक्षम व्यक्तींनी संपर्क साधण्याचे आवाहन कंपनीने केले आहे़