शेगाव व मलकापूर रेल्वेस्थानकाला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 10:52 PM2019-09-05T22:52:17+5:302019-09-05T22:52:27+5:30
श्रीं चे दर्शनासाठी दररोज असंख्य भाविक येतात.
- अनिल उंबरकर
शेगाव: बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावसह मलकापूर रेल्वे स्टेशन ला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव हे संत गजानन महाराज समाधी मंदिरामुळे सर्वत्र प्रसिध्द आहे. श्रीं चे दर्शनासाठी दररोज असंख्य भाविक येतात. असंख्य भाविक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे यात्रेकरूच्या माध्यमातून शेगाव रेल्वे स्टेशन ला चांगले उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळेच शेगाव रेल्वे स्टेशन ला अ दर्जा प्राप्त झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून स्वच्छता अभियान यशस्वी रित्या राबविले. रेल्वे स्टेशन वर नियमित स्वच्छतेला महत्व दिल्या गेले. सोबतच प्रवाशांसाठी विविध सोयी सुविधा मिळवून देण्यावर स्टेशन प्रशासनाकडून नियमितपणे भर दिल्या जात आहे. स्टेशन परिसरात नियमित साफसफाई मुळे स्टेशन निटनेटके स्वच्छ व सुंदर दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांनाकडून रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे.
मागील आठवड्यात स्टेशन परिसराची आय एस ओ मानांकनाबद्दल संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाच्या टीम ने भेट देवून पाहणी केली. तसेच विदर्भ प्रवेशद्वार मलकापूर रेल्वे स्टेशन ला सुध्दा आय एस ओ मानांकन प्राप्त झाले.
सर्वांच्या सहकार्याने रेल्वे स्टेशन ला निटनेटकेपणा आला आहे. यामध्ये रेल्वे प्रवाशांचे स्वच्छतेसाठी मिळत असलेले सहकार्य वाखाणण्याजोगे आहे. तसेच रेल्वे चे अधिकारी व कर्मचारी यांचाही चांगले योगदान आहे. रेल्वे प्रशासनाकडून विविध सोयी सुविधा प्राप्त करून देण्यात येत असल्याने आनंद आहे.
- पी. एम. पुंडकर
स्टेशन प्रबंधक, शेगाव