साखळीतही सुरू झाले आयसोलेशन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:44+5:302021-06-04T04:26:44+5:30

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तसेच निराधार मुलांना आधार देऊन त्यांचे शिक्षण व निवासाची सोय अजय दराखे व सहकाऱ्यांनी साखळी बुद्रूक ...

Isolation centers were also started in the chain | साखळीतही सुरू झाले आयसोलेशन सेंटर

साखळीतही सुरू झाले आयसोलेशन सेंटर

Next

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तसेच निराधार मुलांना आधार देऊन त्यांचे शिक्षण व निवासाची सोय अजय दराखे व सहकाऱ्यांनी साखळी बुद्रूक शिवारातील आपल्या शेतात ‘नंदनवन प्रकल्पा’च्या माध्यमातून केली होती. कोरोनामुळे आजमितीस मुलांसाठीचा प्रकल्प बंद पडला असल्याने या इमारती कोरोना रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी कामी येऊ शकतो, या उदात्त हेतूने दराखे व ग्रामस्थांनी याठिकाणी कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्याचे ठरविले. तेथे सोयी, सुविधा निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून मदतनिधी उभारण्यात आला आणि सुसज्ज सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर, कर्मचारी सेवा देणार आहेत. या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन गुरुवारी सकाळी रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्या जयश्री शेळके, पं. स. सभापती उषा चाटे, सरपंच सुनीता भगत, राणा चंदन, श्लोकानंद डांगे, राजू नाईकवाडे, माजी सरपंच सुरेश चौधरी, उपसरपंच गजानन लवंगे, पोलीस पाटील संदीप सपकाळ, ग्रा.पं.सदस्य गजानन चौधरी, पार्वतीबाई उगले, विजया कोळसे, शीला सुरडकर, विलास रत्नपारखी, मंजुळा जाधव, योगेश सुरडकर, डॉक्टर, ग्रामसेवक, आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

तिसरी लाट थोपवण्यास होईल मदत

जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावागावांमध्ये कोविड आयसोलेशन सेंटर उभारल्या गेल्यास वर्तमान स्थितीत कोरोनाला प्रतिबंध घालण्यास मदत होईल ; शिवाय हीच केंद्रे पुढे तिसरी लाट थोपवण्यासाठी मदतगार ठरणार आहेत. या अनुषंगाने किन्होळा येथे उभारण्यात आलेले आयसोलेशन सेंटर राज्यभर दिशादर्शी ठरला असल्याचे यावेळी तुपकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Isolation centers were also started in the chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.