कोरोना बळीसोबतच शेतकरी आत्महत्यांचा विषय चिंतनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:44 AM2020-10-10T11:44:11+5:302020-10-10T11:44:20+5:30
CoronaVirus, Farmer suicide कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू व शेतकरी आत्महत्या हे दोन्ही विषय सध्या चिंतेचे बनले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती जसजसी वाढली तशी कोरोना संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांचीच अधिक चर्चा सध्या आहे. मात्र गेल्या नऊ महिन्याचा विचार करता जिल्ह्यात १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू व शेतकरी आत्महत्या हे दोन्ही विषय सध्या चिंतेचे बनले आहेत.
मात्र जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी पदभार स्वीकारल्यांतर लगोलग शेतकरी आत्महत्यांचा आढावा घेवून चौकशीवरील प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याचे निर्देश दिले आहे.
त्यानुषंगाने आतापर्यंत १८० पैकी २९ शेतकºयांच्या आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरल्या असून या २९ मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना मदतही देण्यात आली आहे. या २९ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, सध्या ६२ शेतकरी आत्महत्या प्रकरणात मदत देण्याच्या दृष्टीने चौकशीस वेग देण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले. दोन दिवसापूर्वीच त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्वंकष आढावा घेतला. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांसोबतच कोरोना बळींच्या संख्येतही वाढ होत असल्याने दोन्हीचे प्रमाण नगण्य करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजनांची गरज आहे.दीड महिन्यात कोरोनामुळे ५७ मृत्यू
सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात कोरोनामुळे ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एक सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ४८ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत ९ आॅक्टोबर पर्यंतचा विचार करता ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाच्या प्रमाण सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यादरम्यान दुपटीने वाढले आहे. त्यामुळे आॅक्सीजीनची मागणी जिल्ह्यात वाढली होती.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान ३० शेतकरी आत्महत्या
कोरोना संसर्गाची पहिली लाट बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्या दरम्यान आली होती. या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात ३० शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या होत्या तर मार्च एप्रिल आणि मे महिन्या दरम्यान कोरोनामुळे जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या आणि कोरोनाचे बळी या दोन्ही विषायंवर आता गंभीरतेने चर्चा करून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.