सकाळी फिरताना नियम पाळणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:18+5:302021-06-29T04:23:18+5:30
ग्रामीणच्या रुग्णसंख्येत मोठी घट बुलडाणा : ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा तालुक्यात ...
ग्रामीणच्या रुग्णसंख्येत मोठी घट
बुलडाणा : ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा तालुक्यात दिवसाला अगदी चार ते पाच कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्ण हे शहरातीलच राहत आहेत.
दमदार पावसाने दिलासा
डोणगाव : पेरणीनंतर दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आंध्रुड, लाणी गवळी, उमरा देशमुख, शहरापूर शिवारात पावसाने हजेरी लावली.
संकष्ट चतुर्थीला मंदिराच्या बाहेरूनच दर्शन
बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहेत. त्यामुळे रविवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच गणरायाचे दर्शन घेतल्याचे चित्र बुलडाण्यात गणेश मंदिरात दिसून आले.
जांभळाची आवक वाढली
बुलडाणा : मधुमेहास जांभूळ उपयुक्त असल्याने काही वर्षांपासून जांभळाला मागणी वाढली आहे. सध्या येथील बाजारात जांभळाची आवक चांगलीच वाढली आहे. संगम चौक ते तहसील चौकात जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक महिला जांभूळ विक्री करताना दिसून येतात.