नोकरी लागली म्हणतात, मग रुजू केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:23+5:302021-07-31T04:35:23+5:30

चालकवाहकांच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. सध्या काही उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू आहे. यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांचे प्रशिक्षण होईल. त्यानंतर ...

It is said that there is a job, then when will it be implemented? | नोकरी लागली म्हणतात, मग रुजू केव्हा होणार?

नोकरी लागली म्हणतात, मग रुजू केव्हा होणार?

Next

चालकवाहकांच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. सध्या काही उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू आहे. यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांचे प्रशिक्षण होईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.

-संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा

काय म्हणतात उमेदवार....

राज्य परिवहन महामंडळ सरळ सेवा भरती २०१९ चालक तथा वाहक पदाचे उमेदवार असून, फेब्रुवारी २०२० ला सेवापूर्व प्रशिक्षण सुरू झाले होते. मध्यंतरी कोरोनामुळे प्रशिक्षण थांबविण्यात आले होते. आणि काही महिने उलटल्यानंतर मार्च २०२१ला उर्वरित सेवापूर्व प्रशिक्षण चालू झाले. नंतर काही काळाने ते पूर्णही झाले. परंतु अंतिम वाहन चाचणी न घेताच पुन्हा एकदा कोरोनाचे कारण सांगून घरी बसविण्यात आले. इतर काही जिल्ह्यांत उमेदवारास नियुक्‍त्या दिल्या आहे, परंतु आमची अंतिम वाहन चाचणी घेतले नाही. यासंबंधी आपल्या कार्यालयाचा संपर्क साधला तर तेथून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.

आमचे तर प्रशिक्षणही होईना

जिल्ह्यातील २६१ उमेदवारांना चालक-वाहक पदभरतीत पात्र ठरल्यानंतरही दोन वर्षांपासून प्रशिक्षणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे इतर कामकाजही करता येत नसल्याची खंत पात्र उमेदवारांमधून व्यक्त होत आहे.

२०१९ मधील भरतीतील नियुक्त चालक, वाहक : ००

प्रशिक्षण झालेले उमेदवार : ८०

प्रशिक्षण सुरू असलेले उमेदवार : ५८

प्रशिक्षण बाकी असलेले मुले : २६१

Web Title: It is said that there is a job, then when will it be implemented?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.