महिन्याला १७० क्षयरुग्णांचा लागतो शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:59+5:302021-03-26T04:34:59+5:30
जिल्ह्यात डी. एम. सी.साठी एक वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सहा शहरी भागासाठी, सहा टी.बी.एच.व्ही. कार्यरत आहे. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग ...
जिल्ह्यात डी. एम. सी.साठी एक वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सहा शहरी भागासाठी, सहा टी.बी.एच.व्ही. कार्यरत आहे. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पाच प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. जिल्ह्यात एक जिल्हा क्षयरोग केंद्र आहे. तेथे जिल्हा क्षयरोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी कार्यरत आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला अंदाजे शासकीय रुग्णालयातून १२० व खासगी डॉक्टरांकडून ५० असे एकूण अंदाजे १७० नवीन टी. बी. रुग्ण शोधून उपचारावर ठेवले जातात. दरवर्षी अंदाजे एकूण २ हजार ७०० ते २ हजार ९०० टी.बी. रुग्ण शोधून उपचारावर ठेवले जातात. जिल्ह्यामध्ये मार्च २०१६ पासून क्षयरोगाचे निदान करण्यासाठी अत्याधुनिक सिबीनॅट मशीन उपलब्ध आहे. या मशीनद्वारे क्षयरोग तसेच एमडीआर रुग्णांचे निदान सुध्दा करता येते. थुंकीनमुने तसेच इतर अवयवाच्या टी.बी.ची सुद्धा तपासणी करता येते. केवळ दोन तासांमध्ये निदान होते. जिल्ह्यातील शासकीय खासगी डॉक्टर प्रयोगशाळा येथील संशयित टी. बी., एमडीआर रुग्णांची तपासणी मोफत करण्यात येते.
यांच्यासाठी होतो सीबीएनएएटीचा वापर
सीबीएनएएटी तपासणी प्रामुख्याने लहान बालके, एच.आय.व्ही. बाधित रुग्ण, छातीव्यतिरिक्त इतर अवयवाच्या टी. बी. निदानासाठी करण्यात येते. एम. डी. आर. संशयित रुग्ण, खासगी डॉक्टर प्रयोगशाळामधील एमडीआर टी.बी. संशयित रुग्ण इत्यादी नमुन्यांसाठी सीबीएनएएटी मशीनचा वापर करण्यात येतो.
शासकीय यंत्रणा अलर्ट
गतवर्षामध्ये एकूण २ हजार ८५० रुग्णांची सीबीएनएएटीवर तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ५२ रुग्ण टीबी व ६० रुग्ण एमडीआर टीबीचे आढळून आले. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत शासकीय यंत्रणा आरोग्य विभाग खासगी वैद्यकीय व्यावसायिक समन्वय, सी.बी.एन.ए.ए.टी. मशीनद्वारे मोफत तपासणी, दैनंदिन उपचार पद्धतीवरील क्षयरोग, एमडीआर टी. बी.वरील ओषधी, मोफत डीएसटी तपासणी करण्यात येते.
२०२५ पर्यंत क्षयरोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी प्रत्येक स्तरावर सहभाग घेण्यात यावा.
-डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बुलडाणा
२८५०
गतवर्षी झालेल्या तपासण्या
१०५२
टीबीचे रुग्ण
६०
एमडीआर टीबीचे रुग्ण