अतिक्रमणासाठी होते जागावाटप !
By admin | Published: December 18, 2014 01:05 AM2014-12-18T01:05:55+5:302014-12-18T01:05:55+5:30
बुलडाणा पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : शहराला बकाल स्वरूप.
हर्षनंदन वाघ / बुलडाणा
जिल्हा प्रशासन विविध शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करून शहर सौंदर्यीकरणाकडे लक्ष देत आहे. मात्र बुलडाणा नगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढले असून काही ठिकाणी सामूहिक जागा वाटप करून घरे बांधण्यात येत आहेत. शहराच्या विविध कोपर्यात अतिक्रमण करण्यात येत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र आता राज्यमहामार्गाच्या बाजूला तसेच मोक्याच्या जागी अतिक्रमण करण्यात येत आहे. बुलडाणा- मलकापूर रस्त्यावरील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राजवळ पालिकेने गाळे बांधलेले आहेत. मात्र गाळे बंद अवस् थेत आहे. या गाळ्यांच्या बाजूला मोकळ्या जागेत काहींनी अतिक्रमण करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे सर्वांनी सामूहिकपणे जागा वाटप करून घेतली आहे. दोन दिवसापूर्वी संध्याकाळी अ ितक्रमणासाठी जागा वाटप झाल्यानंतर आज १७ डिसेंबर रोजी लाकडी बल्ली व टिनपत्रे ठोकून घरे तयार करण्यात आली आहेत. येणार्या दिवसात या ठिकाणचे अतिक्रमण मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे शहराला आलेल्या बकाल स्वरूपात पुन्हा भर पडणार आहे.