सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवकांचा होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:09+5:302021-02-06T05:05:09+5:30

जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांना २६ फेब्रुवारीपर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रस्ताव सादर ...

It will be an honor to be a pioneer in social work | सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवकांचा होणार गौरव

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवकांचा होणार गौरव

Next

जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांना २६ फेब्रुवारीपर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी दिली आहे. युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. अर्जदाराचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्षापर्यंत असावे. जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग पाच वर्षे वास्तव्य असावे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. अर्जदाराने पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्यचा दाखला देणे आवश्यक आहे.

संस्थांसाठी पात्रता निकष

पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक केले आहे. अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार व संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला देणे आवश्यक राहील.

Web Title: It will be an honor to be a pioneer in social work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.