गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:36+5:302021-04-10T04:34:36+5:30
शासनाने घोषित केलेल्या मिनी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचप दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक, स्टील भांड्याची दुकाने, कापड, ...
शासनाने घोषित केलेल्या मिनी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचप दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक, स्टील भांड्याची दुकाने, कापड, जनरल स्टोअर्स, टेलरिंग व्यवसायिक, सलून, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मोबाईल, फोटो स्टुडिओ, झेरॉक्स, सराफा, फुटवेअर, चहा कॅन्टीन आदी दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे.
यामुळे उपजीविकेचे साधन बंद झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तीन महिनेच सुरू राहिला व्यवसाय
जिल्ह्यात केवळ तीन महिनेच व्यवसाय सुरू राहिला. त्यातही नेहमीप्रमाणे उत्पन्न झाले नाही. कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे ग्राहक बाहेर फिरकलेच नाहीत. त्यामुळे गतवर्षीचे कर्ज फेडणे शक्य झाले नाही, तर आता पुन्हा लाॅकडाऊन लागला असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. शासनाने लाॅकडाऊन रद्द करायला हवा.
व्यापारी, व्यावसायिक, असंघटित क्षेत्रातील लोकांचे गतवर्षात कंबरडे मोडले आहे. या धक्क्यातून सावरतानाच ही दुसरी लाट येत आहे. उत्पन्न घटल्यामुळे आम्हालाही घर चालवताना अनेक अडचणी येत आहेत. मुलांच्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. नवीन खरेदी बंद आहे.
- कोमल पवार, गृहिणी.
गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे आधीच परिस्थिती बिघडली आहे. आम्हाला घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवीन खरेदी बंद असून, दागिने मोडण्याची वेळ आली आहे. दुकाने बंद राहिल्याने घर कसे चालवायचे, हा प्रश्न आहे.
- अंजली जाधव, गृहिणी.