अष्टान्हिका महोत्सवानिमित्त खामगावात निघाली जैन समाजाची शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 10:35 PM2018-01-23T22:35:50+5:302018-01-23T22:37:43+5:30
खामगाव: येथील आदिनाथ मंदिराच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त आयोजित ऐतिहासिक अष्टान्किा महोत्सवात मंगळवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मुमुक्षुबेन(दिक्षार्थी) रोशनीदीदी यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव येथील आदिनाथ मंदिराच्या शतकोत्तर रजतजयंती निमित्त प.पू. साध्वीजी प्रितीधर्माश्रीजी यांच्या मार्गदर्शनात यावर्षी २१ ते २८ जानेवारी या कालावधीत अष्टान्हिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी आचार्य विनयसागर, आचार्य गुणचंद्र सागर सुरीश्वरजी, रविपद्मसागर, जैनेशसागर, साध्वी समयगुणाश्री खामगाव नगरीत उपस्थित असून, मंगळवारी सकाळी ८.३० वाजता दिक्षार्थी रोशनीदीदी यांच्या दिक्षासोहळ्यानिमित्त शहराच्या विविध मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे जैन समाज बांधवांसोबतच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या शोभायात्रेत श्री शतकोत्तर रजत महोत्सव समिती तथा सकल जैन समाजाचे नरेंद्रभाई संकलेचा, अनिलभाई विकमशी, राजेशभाई शहा, मनोज शहा, पश्वीन नागडा, हिरेनभाई लोडाया, संदीप शहा यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर, नगर परिषद अध्यक्ष अनिताताई डवरे, उपाध्यक्ष संजय पुरवार, पाणी पुरवठा सभापती ओम शर्मा, नगरसेवक सतीशआप्पा दुडे आदींनी शोभायात्रेचे स्वागत केले.